मुक्तपीठ टीम
आवाज कुणाचा…शिवसेनेचा! अशा घोषणांनी दणाणून जाणारं मुंबईतील शिवाजी पार्क मैदान. काही वर्ष नाही, तर काही दशकं. एक नाही दोन नाही तर तब्बल सहा दशकं शिवसेना आणि शिवाजी पार्कच एक वेगळं नातं राहिलं आहे. दसरा मेळावा, शिवसेना आणि शिवाजी पार्क यांचं नातं समजून घेण्याचा हा प्रयत्न…
शिवसेना आणि शिवाजीपार्क…नातं ६ दशकांचं!
- शिवाजी पार्क आणि शिवसेना यांचं नातं अतुट असं मानलं जातं.
- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कातच झाला.
- त्यानंतर शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा अखंडित राहिली आहे.
- अपवाद होता तो पावसामुळे एक मेळावा टळल्याचा आणि दुसरे कोरोना संकटांचा.
- वाजत-गाजत शिवाजी पार्कात जमायचं आणि दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटायचं अशी शिवसेनेची स्थापनेपासूनची परंपरा आहे.
- या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख आणि आता शिवसेनापक्षप्रमुख शिवसैनिकांपुढे पुढील दिशा दाखवणारे मार्गदर्शन करतात.
- शिवसेनेची ही परंपरा खंडित करून शिवसेना आपलीच असे दाखवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जातो आहे.
- मात्र, काहीही झालं तरी शिवाजी पार्कातच दसरा मेळाव्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
आता नेमकं काय घडलं?
- शिवाजी पार्कवरील सभेसाठी वर्षानुवर्षे फक्त शिवसेनाच दावेदार होती.
- शिवसेनेतील जून २०२२च्या बंडखोरीनंतरही तेथे शिवसेनेचाच दावा होता.
- यावर्षी २२ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथे आयोजनासाठी अर्ज करण्यात आला.
- त्यानंतर आठवडाभराने ३० ऑगस्ट रोजी बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनीही मुंबई मनपाकडे शिवाजी पार्कसाठी अर्ज केला.
- त्यानंतर एकनाथ शिंदे गटानं एमएमआरडीएच्या बीकेसीमधील मैदानासाठी अर्ज केला.
- एमएमआरडीएने तो अर्ज मंजूर केला.
- शिवसेनेने शिवाजी पार्कच्या जोडीनेच बीकेसीमधील दुसऱ्या मैदानासाठी अर्ज केला, तो अर्ज मात्र फेटाळून लावण्यात आला.
- आता शिवाजी पार्कची परवानगी सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवसेनेलाच मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- ती परवानगी मिळो न मिळो प्रसंगी शिवाजी पार्कात घुसून वाट्टेल त्या मार्गाने मेळावा घेण्याचा शिवसेनेचा निर्धार आहे.
शिंदे गट – भाजपा शिवसेनेला शिवाजी पार्क का नाकारतात?
- पारंपरिक दसरा मेळाव्यात आणले जाणारे हे अडथळे शिवसैनिकांना चेतवून आक्रमक बनवणारे ठरण्याची शक्यता आहे.
- तसेच शिवसेनेला मानणाऱ्या वर्गातही शिवसेनेविषयीची सहानुभूती अधिकच वाढवणारे ठरू शकतात.
- तरीही शिंदे गट आणि भाजपाचे सरकार तसे करत आहे, त्याचं कारण शिवसेना म्हणजे दसरा मेळावा आणि दसरा मेळावा म्हणजे
- शिवसेना हे मराठी माणसांच्या मनातील समीकरणच आहे! पण खरंच हे समीकरण अशा अडथळ्यांमुळे पुसले जाईल? तुम्हाला काय
- वाटतं? युटयुबवर मुक्तपीठनं दिलेल्या पोलमध्ये भाग घ्या, आपलं मत व्हिडीओच्या रिप्लायमध्येही नोंदवा.