मुक्तपीठ टीम
रक्तदान हेच श्रेष्ठदान, असे म्हटले जाते. कारण आपल्या रक्ताने दुसऱ्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचले जाऊ शकते. म्हणून रक्तदानात आपला महाराष्ट्र हा नंबर एक आहे. पण देशातील सर्वात श्रीमंत आणि बडे उद्योगपतीच नव्हे तर सर्वाधिक रक्तदान करणाऱ्या पहिल्या ५ राज्यांच्या यादीत गुजरातचेही नाव येते. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालनंतर गुजरात हे भारतातील चौथ्या क्रमांकाचे रक्तदाते आहे. गुजरात या राज्यामध्ये शंभरहून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या २२५ शतकवीर रक्तदाते हे गुजरातमध्ये आहेत. एवढेच नाही तर देशात २४८ वेळा रक्तदान करणारे हरीशभाई पटेल आणि १०० हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या केतकीबेन शाह नावाची महिलाही इथलीच आहे. येथे दरवर्षी सुमारे ८ लाख युनिट रक्तदान केले जाते.
गुजरातमध्ये रक्तदान करण्याची परंपरा
- गुजरातमध्ये वाढदिवस आणि वर्धापनदिनांपासून सर्व प्रकारच्या कौटुंबिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये रक्तदान ही परंपरा बनत चालली आहे.
- कोरोनानंतरही येथे दरवर्षी ८ लाख युनिट रक्तदान केले जात आहे.
- राज्यात दरवर्षी ५० हजारांहून अधिक रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.
- आज ५ लाखांहून अधिक नियमित स्वयंसेवक रक्तदाते आहेत. येथील अनेक कुटुंबांमध्ये रक्तदान करण्याची परंपरा सुरू आहे.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह गुजरात अव्वल!
- फेडरेशन ऑफ ब्लड डोनर ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस कोलकाता येथील अपूर्व घोष म्हणाले की, देशात चार-पाच राज्ये आहेत जी दरवर्षी रक्तदानात पुढे असतात.
- पण लोकसंख्येच्या बाबतीत गुजरात खूप पुढे दिसतो.
- नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NOCO) च्या आकडेवारीनुसार, २३ कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात ११.७५ लाख युनिट्स, १२ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात १०.५५ लाख युनिट्स आणि ९.७ कोटी लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ९.९२ युनिट्स रक्तदान करण्यात आले.
- गुजरातची लोकसंख्या सुमारे साडेसहा कोटी आहे, मात्र येथे ७.८४ लाख युनिट रक्तदान करण्यात आले.
- गुजरातमध्ये नवीन रक्तदात्यांची संख्याच वाढत नाही, तर नियमित स्वयंसेवकांची संख्याही वाढत आहे.
- याशिवाय रक्तदानातही तामिळनाडू पहिल्या पाचमध्ये आहे.