मुक्तपीठ टीम
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह हा देशातील सर्वात मौल्यवान व्यवसाय समूह बनला आहे. या समूहाचे मार्केट कॅप २०.७४ लाख कोटी रुपये किंवा सुमारे२६० बिलियन डॉलवर पोहोचले आहे. १५४ वर्षे जुन्या टाटा समूहाला मागे टाकत अदानी समूहाने हे स्थान मिळवले आहे. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर टाटा समूहाचे मार्केट कॅप २०.७ लाख कोटी रुपये झाले. याशिवाय मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाचे मार्केट कॅप १७.१ लाख कोटी रुपये आहे. गेल्या काही वर्षांत अदानी समूहाचे मार्केट कॅप रॉकेट वेगाने वाढले आहे. याचा फायदा कंपनीचे अध्यक्ष गौतम अदानींना झाला असून अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकत अदानी आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
अंबानी, टाटांना मागे टाकत अदानी पुढे!
- तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये १८.७ लाख कोटी रुपये किंवा सुमारे २३४ अब्ज डॉलरची भर पडली आहे.
- २०१९ च्या अखेरीस अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप २ लाख कोटी रुपये होते.
- तेव्हापासून समूहाने दर महिन्याला भागधारकांमध्ये सरासरी ५६,७०० कोटी रुपयांची भर घातली आहे.
- या उलट याच कालावधीत टाटा समूहाने ९ लाख कोटी रुपये आणि रिलायन्सने ७.४लाख कोटी रुपयांची भर घातली.
अदानी एंटरप्रायझेसची सुरुवात १९८८ मध्ये
- अदानी समूहाचा व्यवसाय व्यापार, नैसर्गिक वायू, वीज निर्मिती, सिमेंट, रिअल इस्टेट आणि वित्तीय सेवांमध्ये पसरलेला आहे.
- अदानी एंटरप्रायझेसची सुरुवात १९८८ मध्ये अदानींनी केली होती. तेव्हा त्याचे नाव अदानी एक्सपोर्ट्स होते.
- यावेळी त्यांनी शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
- त्यानंतर लवकरच त्यांनी निर्यात-आयातीसाठी मुंद्रा बंदर स्थापन केले.
- आणि आयात गेल्या दोन दशकांत या समूहाने अनेक व्यवसायांमध्ये प्रवेश केला. ग्रीनफिल्ड प्रकल्प, अधिग्रहण आणि संयुक्त उपक्रमांद्वारे कंपनीने आपला व्यवसाय वाढवला.
- समूहाने थर्मल आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले आहेत, तर अनेक बंदरे अधिग्रहित केली आहेत, देशभरातील वीज पारेषण लाइनचे नेटवर्क केले आहे आणि देशातील दोन मोठ्या सिमेंट कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे.
- २००२ मध्ये, अदानी समूहाने सिंगापूरस्थित कंपनी विल्मार इंटरनॅशनलच्या सहकार्याने अदानी विल्मारची स्थापना केली.
- आज ही देशातील आघाडीची FMCG कंपनी आहे.
- तीन वर्षांपूर्वी कंपनीने विमानतळ व्यवस्थापन व्यवसायातही प्रवेश केला होता.