मुक्तपीठ टीम
भाभा अणु संशोधन केंद्रात मेडिकल/ सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी १६ जागा, टेक्निकल ऑफिसर-सी या पदासाठी ३५ जागा अशा एकूण ५१ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि कोलकाता आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- एमएस/ एमडी/ डीएनबी/ एमबीबीएस
- पद क्र.२- १) ६०% गुणांसह पीसीएम विषयात बीएससी २) ६०% गुणांसह फिजिक्स विषयात एमएससी केलेलं असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र. १साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ५० यादरम्यान असणे आवश्यक आहे तर, पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ पर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भाभा अणु संशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट https://www.barc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://recruit.barc.gov.in/barcrecruit/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/12sqfhlNwn35iy063ZkHSbBwKgFP_6H9m/view