मुक्तपीठ टीम
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या प्रखर हिंदूत्ववादी विचारांमुळे हिंदूह्रदयसम्राट असं गौरवण्यात आलं. त्यानंतर मनसेच्या राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. आता नितेश राणे यांनी अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये जनआक्रोश मोर्चात फडणवीस यांचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा केला आहे. त्यांनी दुसऱ्यांदा तसं केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
- अपहरण, धर्मांतरण आणि लव्ह जिहाद प्रकरणी नगर जिल्ह्यात शिर्डीमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
- यात हजारो जण सहभागी झाले होते.
- श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.
- यावेळी नितेश राणे म्हणाले की, यांनी राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे.
- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कडवट हिंदुत्ववादी आहेत.
- तर हिंदूह्रद्यसम्राट देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत.
- हे शिर्डीतील पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
मोर्चात सर्व हिंदूनी एकत्र येण्याचे नितेश राणेंचे आवाहन!!
- धर्मांतरण आणि आदिवासी तरुणांच्या अपहरणाच्या घटनाही वाढल्या आहेत.
- या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.
- यावेळी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.
- अपहरण प्रकरणात पोलीस अधिकारी माहिती द्यायला तयार नाही.
- त्यांना बहुतेक या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री हे आता नवाब मलिक राहिलेले नाहीत, तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आता हसन मुश्रीफ नाहीत, याचा विसर पडलेला दिसतो.
- राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यानेच या प्रकरणात कारवाई आणि चौकशी सुरु आहे.