Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेशी निष्ठा राखणाऱ्या महापौरांच्या घरावर हल्ला! सुतळीबॉम्बही फेकले! विरोध करणाऱ्या जाऊबाईंनाही मारहाण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
jayshree mahajan

मुक्तपीठ टीम

शुक्रवारी सर्वत्र राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मोठ्या जल्लोषात निरोप मिरवणुका काढत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मात्र दुसरीकडे जळगाव जिल्हातील मेहरुण परिसरात एक धक्कादायत घटना घडली. बाप्पाच्या विसर्जनावेळी एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी निष्ठावान राहिलेल्या महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या घरावर पेटते सुतळी बॉम्ब आणि दगड फेकले. या घटनेनंतर पोलिसांनी रात्रीच चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

महापौरांच्या घरावर दगड, सुतळी बॉम्बने हल्ला!!

  • मेहरुन परिसरात महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळून एका सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक जात होती.
  • मंडळाचे कार्यकर्ते महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळ आले असता, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात महापौर महाजन यांच्या घरावर गुलाल फेकला.
  • तसेच काही वेळाने दगड आणि पेटते सुतळी बॉम्बसुद्धा फेकले.
  • घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांनी महापौरांचे निवासस्थान गाठले आणि घटनेची माहिती घेतली.
  • घटनेनंतर संबंधित सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती आहे त्या परिस्थितीत घटनास्थळावर सोडून पळ काढला.
  • यावेळी कारच्या काचाही फोडण्यात आल्या असून त्यामुळे नुकसान झाले आहे.

महापौरांच्या जाऊबाई यांना मारहाण करत घरावर दगडफेक!!

  • या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
  • घटना घडली त्यावेळी महापौर जयश्री महाजन घरी नव्हत्या.
  • नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झालेले त्यांचे सासरे एकटे घरी होते.
  • यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोण्याच्या गोण्या गुलाल महापौरांच्या घरावर उधळला.
  • यावेळी महाजनांच्या जाऊबाईंनी संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
  • घरात सासरे आजारी असल्याचेही सांगितलं.
  • मात्र त्याकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले व समजूत घालणाऱ्या महापौरांच्या जाऊबाई यांना मारहाण करत घरावर दगडफेक केली, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

महापौर जयश्री महाजन संतप्त!!

  • मेहरुण परिसर अतिशय संवेदनशील असतानाही तिथे एकही पोलीस कर्मचारी नव्हता.
  • तसेच घटल्यानंतर घडल्यानंतर या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी आले.
  • त्यांनी पाहणी केली.
  • मात्र त्यानंतरही त्यांनी ही घटना वरिष्ठांना कळवली नसल्याचा आरोपही यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी केला.

Tags: Ganesh MandalJalgoanMayor Jayashree MahajanShivsenaजळगावमहापौर जयश्री महाजनशिवसेनासार्वजनिक गणेश मंडळ
Previous Post

CISFमध्ये स्टेनोग्राफर असिस्टंट सब इंस्पेक्टर, हेड काँस्टेबल पदांवर संधी

Next Post

ट्विटरने व्हिसलब्लोअरला सत्तर लाख डॉलर्स का दिले? मस्कचा खळबळजनक प्रश्न!

Next Post
Elon Musk and twitter Row

ट्विटरने व्हिसलब्लोअरला सत्तर लाख डॉलर्स का दिले? मस्कचा खळबळजनक प्रश्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!