रोहिणी ठोंबरे/ मुक्तपीठ टीम
गणपती बाप्पा मोरया! एकच गजर घुमतोय आसमंतात. सगळीकडे बाप्पांचा मंगलघोष होत आहे. दोन वर्षांच्या कोरोना संकंटानंतर यंदाचा गणेशोत्सव हा अधिकच जल्लोषाचा आणि उत्साहाचा ठरतोय. महाराष्ट्रात अधिकच जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या या सणानिमित्त मोठमोठ्या मंडपांमध्ये बाप्पा विराजमान झाले. त्यासाठी खास देखावेही साकारण्यात आले आहेत. अखिल आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा थेट वैष्णोदेवीच्या दर्शनाची मुंबईतल्या मुंबईत संधी मिळवून दिली आहे.
मुंबईतील आंबोली नाक्यावरील शिवसेना शाखेजवळील अखिल आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली ५३ वर्ष हा उत्सव अगदी जल्लोषात साजरा करते. दरवर्षी हे मंडळ भव्य स्वरुपात गणेशोत्सव साजरा करतं. यावर्षीही त्यांनी विशेष देखावा साकारला आहे. मंडळाने काश्मिरातील वैष्णोदेवीचे मंदिर साकारलं आहे. शिवशंकराच्या दर्शनासाठी डोंगरातून जाण्याचा हा मार्ग येथे पार करावा लागतो. काही लोकांची या पवित्रस्थळी जाण्याची इच्छा असते परंतु, आर्थिक परिस्थिती किंवा इतर कारणांमुळे हे राहून जाते त्यामुळे त्यांना आंबेलीच्या महाराजाच्या दर्शनानिमित्त वैष्णव देवीची यात्राही करता येईल. याबद्दलची संपूर्ण माहिती या विभागातील शिवसेनेचे उपविभागप्रमुख, मंडळाचे अध्यक्ष हारून खान यांनी दिली.
दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने आरास व देखावे पाहण्यासाठीही मोठी गर्दी होत आहे. तसेच याठिकाणी गणेशोत्सवाची संपूर्ण जबाबदारी कार्यकर्तांच्या बळावर यशस्वीरीत्या पार पडत आहे.
- श्री. हारून खान- शिवसेना उप-विभागप्रमुख, अध्यक्ष
- श्री. तुषार राऊत- सरचिटणीस/ उपशाखा प्रमुख
- श्री. विष्णू बाबू मोरे- खजिनदार/ कार्यालय प्रमुख
- श्री. अरविंद देशमुख- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष
अध्यक्ष - श्री. संजय राजाराम कनगुटकर- कार्याध्यक्ष/ सह कार्यालय प्रमुख
- श्री. रमेश मालवणकर, रविंद्र चिले- उपाध्यक्ष
- श्री. दुर्गेश रघुनाथ घाग- चिटणीस/ उपशाखा प्रमुख
- श्री. अव्वास शेख- चिटणीस/ उपशाखा प्रमुख
- श्री. प्रविण नाईक- चिटणीस/ गट प्रमुख
- श्री. प्रकाश पोवार- चिटणीस/ उपशाखा प्रमुख
- श्री. ववन वाईत, श्री. चंद्रकांत सुर्वे- सह खजिनदार/ गट प्रमुख
- श्री. अरविंद देशमुख, श्री. संजय घाडे- सह चिटणीस
- श्री. रवि ढगळे- गट प्रमुख/ सह चिटणीस
- हिशोब तपासणीस- श्री. एकनाथ गोपाळ केरकर (शाखा प्रमुख), श्री. उदय यादव (उपशाखा प्रमुख)
या सर्वांचा मंडळाच्या कार्यात सहभाग असतो.