मुक्तपीठ टीम
लोकसभा निवडणुक २०२४साठी अजून दोन वर्षे बाकी आहेत, पण राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पण पंतप्रधान आणि भाजपाचे सर्वात मोठे ब्रँड नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून कोणाचा चेहरा लोकांसमोर मांडायचा, असा प्रश्न समोर आला की भाजपाविरोधकांचे ऐक्य फुटतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मात्र त्यावर चांगला उपाय शोधला आहे. त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजेच किमान सहमती कार्यक्रमाच्या अंतर्गत एकत्र निवडणुका लढविण्याचा विचार मांडला आहे. त्यामुळे आधी भाजपा आणि मोदींचा पराभव आणि मग चेहरा ठरवला जाईल. पवारांचा हा फॉर्म्युला उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.
शरद पवारांचा किमान सहमतीचा फॉर्म्युला…
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत मोठे विधान केले आहे.
- त्यांनी म्हटलं की, “कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजेच किमान सहमती कार्यक्रमाच्या अंतर्गत एकत्र निवडणुका लढविण्याचा विचार करता येईल.
- विरोधकांनी एकत्र यायला हवे.
- २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करण्याचा फॉर्म्युला त्यांनी दिला आहे.
- त्यांनी बनवलेल्या सूत्राचे पालन केले तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदी सरकारचा पराभव निश्चित आहे.
फोडाफोडी हेच भाजपाचे काम!
- यासोबतच त्यांनी केंद्र सरकार आणि त्यांच्या धोरणांवरही हल्लाबोल केला. २०१४मध्ये दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत, त्यामुळे आता सर्व विरोधी पक्षांनी सध्याच्या सरकारसमोर एकजूट दाखवायला हवी.
- ते म्हणाले, “भाजपने पैशाचा आणि सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटकमधील आमदार फोडले आहेत.
- झारखंडमध्ये हाच प्रयत्न सुरू आहे. देशभरात हेच आहे. फोडाफोडी हेच भाजपचे कामाचे धोरण बनले आहे.”
कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत लढविणार!
- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या एकजुटीवर भर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, मोदी सरकारचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल.
- २०२४च्या निवडणुका कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत लढवण्याचा विचार करू शकतो, असेही ते म्हणाले.
- छोट्या पक्षांना सत्तेतून बेदखल करणे हेच भाजपचे उद्दिष्ट आहे.
- त्याचवेळी नितीशकुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. वेगळे सरकार स्थापन केले. मी याचे स्वागत करतो. मात्र, विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक वेळा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून स्वतःला बाहेर काढले होते.
- यापुढे सत्तेची जबाबदारी स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा नाही.