मुक्तपीठ टीम
शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटामधील वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून पाच सदस्यीय खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे पाच सदस्यीय खंडपीठ येत्या गुरुवारी पहिली सुनावणी घेणार आहे. मात्र, खंडपीठातील न्यायमूर्तींची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. तसेच घटनापीठाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाला कोणताही निर्णय न देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवसेनेसाठी हा दिलासा महत्वाचा असला तरी निकाल कधी लागणार हे मात्र अद्याप अस्पष्टच आहे.
न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सांगितले की, हे प्रकरण परवा घटनापीठासमोर सूचीबद्ध केले जावे आणि खंडपीठ सुरुवातीला निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीशी संबंधित चिन्हावर निर्णय घेईल.
या मुद्यावर घटनापीठ निर्णय घेणार
- विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव प्रलंबित असताना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करू शकतात का?
- या दरम्यान सभागृहाचे कामकाज कसे सुरू राहिल?
- जकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका या मुद्यांवर घटनापीठ सुनावणी करणार आहे.
२५ ऑगस्टला होणार पुढील सुनावणी!!
- ३ आणि ४ ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती.
- तेव्हापासूनच सातत्यानं हे प्रकरण पुढे ढकललं जात होतं.
- शिवसेनेसाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या वतीनं तातडीनं मेन्शन करण्यात आलं.
- त्यामुळे आज अखेर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
- आता २५ ऑगस्टला याप्रकरणाची पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होईल.