Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यायाधिकरण न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश, रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या मुलाच्या आईला मिळणार ३ कोटींची नुकसान भरपाई

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
court order

मुक्तपीठ टीम

२०१६ मध्ये झालेल्या मुलाच्या मृत्यूसाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या मातेला अखेर न्याय मिळाला आहे. मुंबईत रस्ते अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला, त्यावर न्यायाधिकरण न्यायालय म्हणजेच ट्रायब्यूनल न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडली. न्यायाधिकरण न्यायालयाच्या आदेशानुसार, मुलाच्या आईला ३ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळणार आहेत. न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर विमा कंपन्या ही भरपाई देतील.

काय आहे नेमके प्रकरण?

  • २०१६मध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि त्याच्या वाहनाची धडक होऊन एका या तरुणाचा मृत्यू झाला होता. तो कोटक महिंद्रा बँकेत अधिकारी होता.
  • भूषण जाधव असे त्याचे नाव आहे. तो कुटुंबीयांसह महामार्गाच्या बाजूला असलेल्या गावात गेला होता, जिथे त्यांचे नातेवाईक राहतात. त्याचे कुटुंबीय नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते, तर भूषण आणि त्याचे वडील गाडीत बसले होते. हे कुटुंब पालघरला जात होते.
  • ३८ वर्षीय भूषण बँकेत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट होता. त्याला मासिक पगार २ लाख रुपये होता.
  • या तरूणाचे लग्नही होणार होते. राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला इनोव्हा निष्काळजीपणे पार्क केल्याचे न्यायाधिकरणाने सांगितले.
  • न्यायाधिकरणाने सांगितले की, राष्ट्रीय महामार्गालगत वाहनांची पार्किंग सर्वांसाठी खुली नाही, ज्यावर वाहने भरधाव वेगाने जात आहेत.
  • तर, इनोव्हा कारचा चालक म्हणजेच भूषणने आपले वाहन राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभे केल्याने तोही अपघातास काही प्रमाणात जबाबदार आहे.

एकंदरीत निष्काळजीपणाचे प्रकरण असल्याचे लक्षात घेऊन, न्यायाधिकरणाने विमा कंपनी, मालक आणि आक्षेपार्ह कार, महिंद्रा पिकअपचा चालक यांना ७०% नुकसान भरपाई सहन करण्याचे निर्देश दिले. उर्वरित ३०% नुकसान भरपाई विमा कंपनी, चालक आणि इनोव्हा कारच्या मालकाने द्यायची आहे ज्यामध्ये पीडित व्यक्ती प्रवास करत होता.

‘हा’ अपघात निष्काळजीपणाने झाला, महिंद्रा पिकअप कार त्यास मुख्य जबाबदार- न्यायाधिकरण न्यायालय

  • न्यायाधिकरणाने महिंद्रा पिकअपला प्रामुख्याने जबाबदार धरले.
  • न्यायाधिकरण न्यायालयाने म्हटले की, हा अपघात भरदिवसा साडेआठच्या सुमारास घडला. संबंधित वेळी महिंद्रा पिकअप कार भरधाव वेगात होती.
  • या घटनेत महिंद्रा पिकअप कारचे नियंत्रण न राहिल्याने कारच्या मागील बाजूस धडकली. इनोव्हा कार त्याला दुरूनच दिसत असतानाही, आपल्या कारवर नियंत्रण ठेवता आले नाही.
  • राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या इनोव्हा कारच्या चालकाचा निष्काळजीपणा होता मात्र पिकअपच्या चालकाचा त्यापेक्षा अधिक निष्काळजीपणा होता.

अपघात आणि अकाली मृत्यूला महिंद्रा पिकअपचा चालक आणि इनोव्हाचा चालक भूषण जाधव जबाबदार असल्याचे न्यायाधिकरणाने म्हटले आहे. भूषणची आई रजनी जाधव यांनी न्यायाधिकरणाला सांगितले की, कारमध्ये तिचा नवराही मुलाच्या शेजारी बसला होता, मात्र ते गंभीर जखमी झाला होते. २०१७ मध्ये, दोन विमा कंपन्यांनी २०१५मध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कार अपघातात मरण पावलेल्या पायलटच्या ६८ वर्षीय वडिलांना सुमारे ३ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले होते.


Tags: DamagesLawmuktpeethRoad Accidental DeathTribunal Courtकायदा पोलीसघडलं-बिघडलंनुकसान भरपाईन्यायाधिकरण न्यायालयमुक्तपीठरस्ते अपघाती मृत्यू
Previous Post

लाऊडस्पीकरवरील अजान कोणाच्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करत नाही: कर्नाटक उच्च न्यायालय

Next Post

शिवसेना कोणाची? पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निकाल कधी?

Next Post
maharashtra political crisis how many cases in supreme court?

शिवसेना कोणाची? पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निकाल कधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!