मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आता भारतात आहे. जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे काम नुकतेच पूर्ण झालं. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेनं हा पूल उभारला आहे. या पुलामुळे प्रवाशांना फायदा होईलच. तसंच दोन देशांच्या सीमा जवळ असल्याने हा पूल संरक्षणासाठीही उपयोगी आहे.
जगातील सर्वात उंच भारतीय रेल्वे पूल आहे तरी कसा?
- १७ खांब असलेला चिनाब रेल्वे पूल ही अभियांत्रिकी क्षेत्रातील मोठी कामगिरी मानली जाते.
- त्याची लांबी १३१५ मीटर असून पूल ३५९ मीटर उंचीवर बांधलेला आहे.
- हा पूल १०० किमी वेगाने रेल्वे गाड्या चालवण्यासाठी बनवण्यात आला आहे.
- चिनाब पुलाचे जीवन १२० वर्षे मानले गेले आहे.
- तीव्र भूकंपही या पुलाचे नुकसान करू शकत नाही.
- टीएनटीचे स्फोट सहन करण्याची क्षमताही या पुलामध्ये आहे.
- अभिमानाची बाब अशी की, हा पूल भारतीय रेल्वेने तयार केला आहे.
- तो बनवण्यासाठी आतापर्यंत २८ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.
- आता देशवासीयांसाठी रेल्वेने जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा पूल!
- चिनाब रेल्वे पूल देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
- पुलापासून थोड्याच अंतरावर दोन देशांसोबतची भारताची सीमा आहे.
- चिनाब पुलाचे काम पूर्ण झाल्याने लष्कराला रेल्वेने सहज ये-जा करणे शक्य होणार आहे.
- चिनाब रेल्वे ब्रिज जम्मूमधील कटरा आणि काश्मीरच्या लांब दुर्गम रस्त्याला जोडण्यासाठी काम करेल.
- हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक लाइनचा भाग आहे.
- रेल्वे मंत्री अश्निनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर चिनाब रेल्वे पुलाच्या डेक क्लोजर समारंभाचा व्हिडिओ पोस्ट करून गोल्डन जॉइंट काम पूर्ण झाल्याची माहिती दिली.
- याआधी पुलाचा फोटो शेअर करताना रेल्वेमंत्र्यांनी लिहिले की, ढगांच्या वर जगातील सर्वात उंच कमान असलेला चिनाब ब्रिज.
- चिनाब रेल्वे पुलाचे चित्र पाहून ते एखाद्या पेंटिंगपेक्षा कमी वाटत नाही.