मुक्तपीठ टीम
तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित. पण जर तुम्ही बाइक चालवताना बुटांऐवजी शूज घालत असाल तर तुम्हाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं की फक्त हेल्मेट नाही म्हणून नाही तर आता पायात बुटांऐवजी चप्पल असली तरी दंड होण्याची शक्यता आहे.
भारतात दररोज अनेक रस्ते अपघातांची नोंद होत असते. हे अपघात नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणामुळे होतात. देशातील रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकार रोज नवनवीन नियम लागू करत असते. हे नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बनवले आहेत. या नियमांचे पालन करून स्वतःला आणि कुटुंबातील सदस्यांना मोठ्या संकटापासून वाचवू शकता. बाईक चालवताना जसे हेल्मेट घालणे बंधनकारक आहे, तसेच शूज घालणे देखील आवश्यक आहे. जर तुम्ही बाईक चालवताना चप्पल घातली असेल, तर सावधान, जर तुम्ही चप्पल घालून दुचाकी चालवताना पकडले गेले तर जबरदस्त फाईन बसू शकतो.
बऱ्याचदा आपण घाईघाईत शूज घालायला विसरतो. कंटाळा येतो. त्यामुळे चप्पल घालून बाईक घेऊन बाहेर पडतो. चप्पल घालून दुचाकी चालवणे नियमांचे उल्लंघन आहे. अशा चुका केवळ नवीन दुचाकी चालकांकडून होत नाहीत तर अनेक वर्षांपासून गाडी चालवणाऱ्या लोकांकडूनही होतात. जर तुम्ही चप्पल घालून दुचाकी चालवताना पकडले गेले तर तुमच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शुल्क आकारले जाईल आणि फाईन बसेल.
बाईक चालवताना शूज घालणं अनिवार्य!!
- चप्पल घालून बाइक चालवत असाल तरनमोटार वाहन कायद्यानुसार, भारतात बाइक चालवताना काही विशिष्ट कपडे घालणे आवश्यक आहे.
- बाईक चालवताना तुम्ही हेल्मेट घालणे आवश्यक आहे.
- तसेच शूज घालणे देखिल अनिवार्य आहे.
- जर तुम्ही चप्पल घालून दुचाकी चालवताना पकडले, तर हजार रुपये फाईन बसू शकतो.
या चुकांमुळेही बसू शकतो फाईन!
- बाईकच्या मागे बसलेल्या व्यक्तीने जरी हाफ पेंट घातली, तरी फाईन बसू शकतो.
- जर तुम्हीही हाफ पेंट घालून बाईकच्या मागे बसलात, तर वाहतूक पोलिस तुमचे २ हजार रुपयांचे फाईन लावू शकतात.
- त्यामुळे जर तुम्हाला फाईन आणि तुरुंगात जाणे टाळायचे असेल, तर वाहतूक नियमांचे पालन करायला विसरू नका.