मुक्तपीठ टीम
स्विगी हे भारतीय ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. ‘ऑनलाइन’ फूड ऑर्डरिंग आणि ‘डिलिव्हरी’ सुविधा पुरवणाऱ्या स्विगीने आता एक चांगला निर्णय घेतला आहे. सध्या बेरोजगारी सुरू असल्याने घर चालवण्यासाठी फूड डिलिव्हरीसारखे पर्याय समोर येत आहेत. अशात आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्यांना तर काही वेळेस डबल ड्युटी करावी लागते. त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय तयार झाला आहे. स्विगीने ‘मूनलाइटिंग पॉलिसी’ आणली आहे, यामध्ये कर्मचारी फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरीसह इतर काम करू शकतात. हा निर्णय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
‘मूनलाइटिंग पॉलिसी’ म्हणजे काय?
- १. ‘मूनलाइटिंग पॉलिसी’ अंतर्गत कर्मचाऱ्यांना दुसरी नोकरी करण्याची मुभा आहे.
- २. काही अटी व शर्तींच्या अधीन राहून ते त्यांच्या प्राथमिक नोकरीच्या कामाच्या तासांव्यतिरिक्त दुसरे काम करू शकतात.
- ३. कंपनीने या हालचालीमागील कारण स्पष्ट केले की, देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान, अनेक काम करणार्या लोकांनी नवीन छंद जोपासले, अनेकांनी असे उपक्रम सुरू केले ज्यामुळे त्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळतो. “हे स्वयंसेवी संस्था, नृत्य प्रशिक्षक, सोशल मीडियावर कंटेंट प्रदान करणे असू शकते.”
‘मूनलाइटिंग पॉलिसी’ आणण्यामागे स्विगीचा काय उद्देश आहे?
- १. स्विगीचा असा विश्वास आहे की, पूर्णवेळ रोजगाराव्यतिरिक्त, असे प्रकल्प एखाद्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.
- २. गेल्या महिन्यात, स्विगीने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची गरज नसून, कायमस्वरूपी कोठूनही काम करण्याची सुविधा दिली आहे.