मुक्तपीठ टीम
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे एक यशस्वी व्यापारी आहेत. ते नेहमीच कोणाचे-ना-कोणाचे प्रेरणादायी ट्विट करतच असतात. काही वेळेस हे ट्वीट गंमतीशीरही असते. आताही असाच काहीसा प्रकार घडला आहे. अशोक कुमार नावाच्या एका व्यक्तीने एक प्रेरणादायक ट्विट केले आहे. अशोक कुमार नावाच्या युजरने ट्विटरवर त्याच्या पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “@anandmahindra १० वर्षांच्या मेहनतीनंतर नवीन महिंद्रा #XUV700 खरेदी केली, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.”
अशोक कुमार या वव्यक्तीने १० वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांची ड्रीम कार म्हणजेच महिंद्रा XUV700 खरेदी केली आणि ही बातमी त्यांने ३१ जुलै रोजी ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्ससोबत शेअर केली. आपल्या नवीन कारसोबतचा स्वतःचा फोटो शेअर करत त्याने आनंद महिंद्रा यांचे आशीर्वादही मागितले. महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांनी त्यांच्या ट्विटला उत्तर दिले, जे अगदी हृदयस्पर्शी आहे.
अशोक कुमारच्या ट्वीटला आनंद महिंद्राचे प्रतिउत्तर
- महिंद्रा XUV700 खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अशोकला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “धन्यवाद, परंतु महिंद्राच्या वाहनाला पहिली पसंती बनवून तुम्हीच आशीर्वाद दिलात.”
- महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आणि पद्म पुरस्कार विजेते आनंद महिंद्रा यांनी पुढे लिहिले, “तुम्हाला हे यश तुमच्या मेहनतीमुळे मिळाले आहे… ‘हॅपी मोटरिंग’.”
आनंद महिंद्रा हे नेहमीच सर्वांना प्रेरित करतात
- देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे प्रेरक ट्विट आणि त्यांच्या चाहत्यांना कमेंट विभागात दिलेली उत्तरे हेडलाईन बनतात.
- नुकताच आनंद महिंद्रा यांनी एक असा फोटो शेअर केला आहे, जो पाहून प्रत्येकाला खूप काही शिकायला मिळाले
- अनेक लोक महिंद्रांना त्यांचे आयडॉल मानतात आणि अनेक वेळा आनंद महिंद्रा लोकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात. अनेकवेळा ते ट्विटरच्या माध्यमातून लोकांना मदत करतात.