मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय केमिकल्स अॅंड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये पदवीधर अॅप्रेंटिस या पदावर १५० जागा, टेक्निशियन अॅप्रेंटिस या पदावर ११० जागा, ट्रेड अॅप्रेंटिस या पदावर १३६ जागा अशा एकूण ३९६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि रायगड आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पदवीधर अॅप्रेंटिस- बी.कॉम/ बीबीए/ पदवीधर
- टेक्निशियन अॅप्रेंटिस- केमिकल/ सिव्हिल/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- ट्रेड अॅप्रेंटिस- बी.एससी/ १०वी उत्तीर्ण/ ०८वी उत्तीर्ण/ पीसीबी १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय केमिकल्स अॅंड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.rcfltd.com/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा:
https://www.rcfltd.com/hrrecruitment/recruitment-1