मुक्तपीठ टीम
पिझ्झा प्रेमींनी काळजी घेणे आवश्यक आहे. डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये दररोज सुमारे २५० ते ३०० पिझ्झाची विक्री होते. पिझ्झाशिवाय इतर फास्ट फूडही विकले जातात. सर्व खाद्यपदार्थांमध्ये भेसळयुक्त सॉस वापरले जात होते. डॉमिनोजसारख्या नामांकित कंपनीच्या पिझ्झामध्ये वापरल्या जाणार्या सॉस आणि रिफाइंड उत्पादनांच्या नमुण्यातील तपासणीत घोळ असल्याचे आढळून आले आहे. एडीएम कोर्ट म्हणजेच अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. याशिवाय व्हिक्टोरिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या डाळींचे नमुनेही अयशस्वी झाल्याचे आढळून आले आहे.
व्हिक्टोरिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या डाळीमध्येही घोटाळा, १० लाखांता दंड!
- दिल्लीतील प्रसिद्ध कंपनी व्हिक्टोरिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तूर डाळीचे दोन नमुने अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने ऑक्टोबर २०२० मध्ये घेतले होते.
- तपासणी अहवालात डाळींमध्ये आर्द्रतेचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले.
- याशिवाय मोठ्या प्रमाणात डाळींचे नुकसान झाले. ज्यासाठी एडीएम कोर्टाने 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.
सॉस, रिफाइंड दर्जाच्या उत्पादनातही घोळ, पिझ्झा कंपनीला ५ लाखांचा दंड!
- दिल्ली रोडवरील डॉमिनोज रेस्टॉरंटच्या अन्न सुरक्षा विभागाने २०१९मध्ये सॉसचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले होते.
- यानंतर टीमने २०२०मध्ये रिफाइंड नमुना घेतला. चाचणीमध्ये रिफाइंडच्या पॅकेजिंग पातळीत घट आढळून आली. याशिवाय सॉसची गुणवत्ता प्रमाणाविरुद्ध असल्याचे आढळून आले.
- अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सॉसची गुणवत्ता कंपनीने ठरवलेल्या मानकांपेक्षा खूपच कमी होती. तपास अहवालात हे समोर आले आहे.
- एडीएम कोर्टाने पिझ्झा कंपनीला ५ लाखांचा दंड ठोठावला. एडीएम कोर्टाने या दोन्ही कंपन्यांना मिळून १५ लाखांचा दंड ठोठावला आहे.
फूड इन्स्पेक्टरच्या पथकाने डॉमिनोज पिझ्झा कंपनीत वापरलेले रिफाइंड तेल आणि पिझ्झा सॉसचे नमुने घेतले. दोन्ही नमुने भेसळयुक्त असल्याचे आढळून आले. दोन्ही नमुने फेल झाल्याने ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर व्हिक्टोरिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या डाळीचे नमुने फेल झाल्याने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.