मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांवर ही कारवाई केली आहे. या प्रकरणावर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय यंत्रणेच्या भीतीने आमच्याकडे व भाजपाकडे येण्याचे ‘पुण्यकाम’ करू नका, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
केंद्रीय यंत्रणा मागे लागली असेल, तर आमच्याकडे व भाजपाकडे येऊ नका- एकनाथ शिंदे
- ईडीची भीती दाखवून शिंदे गटात व भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
- यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,राऊत यांना कोणी बोलावले नाही.
- त्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी चालू आहे.
- त्यात त्यांचा दोष आहे की नाही, हे समजेल.
- राऊत स्वत:च ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणायचे.
- महाविकास आघाडीचे ते मोठे नेते होते.
- तुम्ही रोज सकाळी त्यांना टीव्हीवर दाखवत असत; पण आम्ही सुडाचे राजकारण करत नाही.
- तसे केले असते तर न्यायालयाने सरकारला फटकारले असते; पण तसे घडत नाही.
- त्यामुळे चौकशी हा स्वतंत्र विषय आहे; पण अशी भीतीमुळे आलेली माणसे आमच्याकडे नकोत.
- मी पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो आहे की, कोणाच्या मागे यंत्रणा लागली असेल तर आमच्याकडे व भाजपाकडे येऊ नका.
- कोणावर तरी दबाव टाकून कोणालाही आमच्यात घेतलेले नाही.
- अर्जुन खोतकर यांचा प्रवेश या दबावातून असल्याची चर्चा सर्वत्र होती.
- मात्र अर्जुन असो वा कोणी असो, असे दबावाने कोणाला आमच्यात घेतले नाही.
एकनाथ शिंदेंच्या नावाने घरात १० लाख मुद्दाम ठेवले असतील: केसरकर
- संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या १० लाखांच्या रक्कमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहण्यात आले होते.
- कदाचित संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काही करायचे असेल, त्यासाठी त्यांना अयोध्येला जायचे असेल.
- त्यासाठी संजय राऊत यांनी हे पैसे राखीव ठेवले असतील.
- या पैशांचा स्रोत दाखवावा लागेल.
- तो त्यांनी दाखवावा, राऊत यांच्याकडे त्याबाबत माहिती असेल, असे केसरकर यांनी म्हटले.
- तसेच संजय राऊत यांनी हे पैसे जाणीवपूर्वक ठेवले असावेत, अशी शक्यताही दीपक केसरकर यांनी बोलून दाखवली.
- संजय राऊत यांनी मुद्दाम या पैशांवर एकनाथ शिंदे यांचे नाव लिहले असेल तर ते कोणालाही कळणार नाही.
- कारण संजय राऊत अत्यंत हुशार आणि बुद्धिमान आहेत. ते काहीही करू शकतात.
- पण या पैशांशी एकनाथ शिंदे यांचा कोणताही संबंध नाही.
- आम्ही गुवाहाटीमध्ये असतानाही आमदारांना पैसे देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
- परंतु, तेव्हाही आम्ही आमच्या हॉटेलच्या रूम आणि घरांची झडती घ्या.