मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय तपास संस्थेने आज ISISच्या कारवायांशी संबंधित ६ राज्यांमध्ये १३ संशयितांच्या घरांची झडती घेतली. एनआयएच्या या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
ईसिस कनेक्शन: महाराष्ट्रासह ६ राज्यांमध्ये धाडी
- मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन जिल्हा
- गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्हा
- बिहारमधील अररिया जिल्हा
- कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूर शहर जिल्हे
- महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्हे
- उत्तर प्रदेशातील देवबंद जिल्हा
ISIS मॉड्यूलच्या संपर्कातील विद्यार्थ्याला यूपीत अटक
- उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये रविवारी एनआयए आणि यूपी एटीएसने देवबंदमध्ये छापा टाकून एका संशयित तरुणाला अटक केली.
- संशयित तरुण हा मदरशाचा विद्यार्थी आहे.
- तो आयएस मॉड्यूलच्या संपर्कात होता.
- तो बराच काळ एनआयएच्या रडारवर होता.
- एनआयएच्या पथकाने आज सकाळी त्याला मदरशातूनच ताब्यात घेतले.
- स्थानिक पोलिसांनी अद्याप एनआयएच्या कारवाईला दुजोरा दिलेला नाही.
- यूपी एटीएस आणि एनआयएने गोपनीय माहितीच्या आधारे या संशयित दहशतवाद्याला पकडले आहे.
- या दहशतवाद्याचा सीरियातील बॉम्बस्फोटांशीही संबंध असल्याचे समोर आले आहे.
- सध्या तो एटीएस सोबत आहे.