मुक्तपीठ टीम
डिजीटलायझेशनच्या जगात आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आधार कार्डमुळे आपण भारताचे नागरिक आहोत ही ओळख पटते. अशा परिस्थितीत तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. यासोबतच तुमचा आधार अॅक्टिव्ह आहे की, नाही हे देखील तपासावे. त्यासाठी वेळोवेळी पडताळणी करावी. आधार कार्ड ऑनलाइन पडताळण्याची पद्धत खूप सोपी आहे.
आजच्या काळात सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सिमकार्ड अनिवार्य आहे. यामुळेच सायबर गुन्हेगारी प्रकरणे वाढली आहेत. डुप्लिकेट आधार कार्ड बनवण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यूआयडीएआयने बनावट आधार कार्ड बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत ६ लाख बनावट आधार कार्ड रद्द करण्यात आले आहेत.
डुप्लिकेट आधार कार्डच्या प्रकरणांमध्ये यूआयडीएआय करणार कारवाई
- डुप्लिकेट आधार कार्डच्या प्रकरणांमध्ये खूप वाढ झाली आहे.
- आधार कार्डचा कोणत्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया सतत कार्यरत आहे.
- यूआयडीएआय चुकीच्या पद्धतीने तयार केलेले आधार कार्डवर देखील कारवाई करणार आहे.
- यूआयडीएआयने देशातील ६ लाख डुप्लिकेट आधार कार्ड रद्द केले आहेत. चुकीच्या पद्धतीने डुप्लिकेट आधार बनवल्याबद्दल प्राधिकरणाने ही कारवाई केली आहे.
फेशियल रेकग्निशन फिचरचा वापर
- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत एक माहिती दिली आहे.
- चंद्रशेखर म्हणाले की, यूआयडीएआय डुप्लिकेट आधार पडताळणीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करत आहे आणि आता व्हेरिफिकेशन फिचर म्हणून फेशियल रेकग्निशन जोडले गेले आहे.
- डुप्लिकेट आधार व्यतिरिक्त पेन्शनच्या पडताळणीसाठी फेशियल रेकग्निशन देखील लागू करण्यात आले आहे.
- आतापर्यंत, १ लाख निवृत्ती वेतनधारकांना या तंत्रज्ञानाद्वारे प्रमाणित केले गेले आहे.
आधार व्हेरिफिकेशन कसे करायचे?
- सर्वप्रथम तुम्हाला यूआयएडीआय वेबसाइट www.uidai.gov.in वर जावे लागेल
- वेबसाइटवर आधार सेवांमध्ये आधार क्रमांक प्रविष्ट करा वर क्लिक करा.
- आता समोर एक नवीन पेज उघडेल. येथे, १२ अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा.
- आधार क्रमांक खरा असल्यास, वेबसाइटवर आधार पडताळणी पूर्ण झाल्याचा संदेश येईल. यासह, तुमचे इतर तपशील देखील दाखवले जातील.
- वारंवार प्रयत्न करूनही तुम्ही आधार क्रमांकाची पडताळणी करू शकत नसल्यास, वेबसाइट तुम्हाला सांगेल की तुमचा आधार क्रमांक अस्तित्वात नाही.