मुक्तपीठ टीम
प्रसिद्ध येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील उद्योगपती बिल्डर अविनाश भोसले यांनी लंडनमध्ये हजार कोटींची मोठी मालमत्ता खरेदी केल्याचं समोर आले आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात, डीएचएफएलकडून मिळालेल्या ५५० कोटींपैकी ३०० कोटी रुपये भोसले यांनी लंडनमध्ये मालमत्ता खरेदीसाठी खर्च केल्याचे म्हटले आहे.
भोसलेंविरोधात सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल!!
- दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL) आणि येस बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने भोसले यांना अटक केली आहे.
- सोमवारी त्याच्याविरुद्ध विशेष सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
- मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्र हे सत्यन गोपालदास टंडन, मेट्रोपोलिस हॉटेल्स एलएलपी, एबीआयएल इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, एबीआयएल हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, अरिंदम डेव्हलपर्स, अविनाश भोसले ग्रुप आणि त्यांच्यावरील गुन्ह्याबद्दल आहे.
- फ्लोरा डेव्हलपमेंट लिमिटेडचाही आरोपपत्रात उल्लेख आहे.
आरोपपत्रात काय म्हटलं?
- या प्रकरणातील सह आरोपी संजय छाबरिया यांनी ३१७.४० कोटी रुपये वळते केले.
- ही रक्कम म्हणजे भोसले यांनी डीएचएफएलला येस बँकेकडून कर्जापोटी दिलेले होते, असे आरोपात म्हटले आहे.
- सीबीआयच्या मते, एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चरला ४३ कोटी रुपये आणि मेट्रोपोलिस हॉटेल्सला १४० कोटी रुपये देण्यात आले होते.
- डीएचएफएलचे कपिल वाधवान यांनी एप्रिल २०१८ मध्ये येस बँकेने डीएचएफएलमध्ये गुंतवणूक केल्यानंतर लगेच वसुलीसाठी मंजुरी दिली होती.
- एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रोपोलिस हॉटेल दोन्हीही भोसले यांच्या मालकीचे आहेत.
- याशिवाय भोसलेच्या इतर तीन संस्थांना कपिल वाधवन यांनी वित्तपुरवठा केलेल्या अनेक प्रकल्पांसाठी सल्लागार शुल्क म्हणून ६८.८० कोटी रुपये मिळाले, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
- एकूणच, भोसले यांच्या कंपन्यांना डीएचएफएलकडून ५६९.२२ कोटी रुपये मिळाले. डीएचएफएलला ही रक्कम येस बँकेकडून मिळाली होती.
अविनाश भोसलेंवर नेमके कोणते आरोप?
- बहुचर्चित येस बँक आणि डीएचएफएल प्रकरणात गैरव्यवहार करत २९२ कोटी रुपये इतरत्र वळवण्याचा आरोप भोसले यांच्यावर आहे.
- २०१८ मध्ये ही पैसे वळवल्याचा आरोप सीबीआयने केले आहे.
- वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
- सीबीआयच्या मते, यात मोठ-मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश आहे.
- या नेटवर्कमध्ये बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे.
- ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची ४० कोटींची संपत्ती जप्त झाली आहे.
- यात त्यांच्या विविध कंपन्यांचे शेअर्स, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे.