मुक्तपीठ टीम
शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील वाद विकोपाला गेला आहे. दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. उद्धव ठाकरे हे सातत्याने बंडखोरांविरोधात आक्रमक आहेत. त्यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोरांना माझ्या वडिलांचा फोटो न वापरता निवडून या असे आव्हान दिले आहे. मात्र त्यांच्या या आव्हानावर भाजापा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इतरांना म्हणतात की, माझ्या वडिलांचा फोटो न वापरता निवडून या. पण मग पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुमचे वडील नव्हते. मग तुम्ही २०१९ च्या निवडणुकीवेळी वरळी मतदारसंघातील बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांचा फोटो का वापरला, असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरेंकडून संवेदनशील आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा!!
- रश्मी वहिनींच्या दैनिक ‘सामना’त उद्धव ठाकरे यांनी आज मुलाखत दिली.
- संजय राऊत यांनीच ही मुलाखत घेतली.
- त्यामुळे या मुलाखतीचे स्वरूप कौटुंबिक होते.
- यामध्ये उद्धव ठाकरे यांना कोणतेही अडचणीचे प्रश्न विचारले गेले नाहीत.
- ही मुलाखत म्हणजे जनतेच्या मनातील आपली भंगलेली प्रतिमा सुधारण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होता.
- मात्र, तो अयशस्वी ठरला.
- उद्धव ठाकरे म्हणतात की, विरोधी पक्ष संवेदनशील आणि सुसंस्कृत असावा.
- ते इतरांना गद्दार म्हणतात.
- मग २४ ऑक्टोबर २०१९ ला तुम्ही काय केले?
- तुम्ही विधानसभेत असंसदीय शब्द वापरता, आम्ही विरोधकांच्या उरावर बसू, असे म्हणता.
- आता उद्धव ठाकरे विरोधी पक्षात आहेत, त्यांच्याकडून आम्हाला संवेदनशील आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा आहे.
उद्धव ठाकरे यांनी सूडाचे राजकारण केले!!
- उद्धव ठाकरे असेही म्हणाले की, सुडाचे राजकारण करू नका.
- पण नितेश राणे, नारायण राणे यांच्यावरील कारवाई, देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस आणि हनुमान चालीसा म्हणून पाहणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना १४ दिवस जेलमध्ये टाकून तुम्ही काय केलेत.
- गेल्या ६० वर्षांमध्ये मुख्यमंत्री काम करायचे, त्याची बातमी होत नसे.
- आईने मुलासाठी स्वयंपाक केला, तर त्यामध्ये बातमी करण्यासारखे काहीही नसते.
- मात्र, ६० वर्षांमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री मंत्रालयात गेले, याची बातमी झाली.