मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रासारखाच पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापा टाकला आहे. यामुळे आता ईडीचे पुढचे मिशन पश्चिम बंगाल असल्याचे दिसत आहे. ईडीने अर्पिता मुखर्जीच्या घरातून २० कोटी रुपये जप्त केले आहेत. याशिवाय २० मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. घटनास्थळी आढळलेल्या नोटांमध्ये २ हजार आणि पाचशेच्या नोटांचा डोंगर झाला आहे. ईडीने नोटा मोजण्यासाठी मशीन मागवल्या आहेत. सध्या जरी आरोप बॅनर्जी सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर झाली असली, तरी ईडीच्या मिशन बंगालचं खरं लक्ष्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच असण्याची चर्चा आहे.
ईडीची छापेमारी सुरूच:
- ईडीकडून पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्याशी संबंधित विविध परिसरांमध्ये शोध मोहीम राबवली जात आहे.
- यामध्ये, ईडीने अर्पिता मुखर्जीच्या निवासी परिसरातून सुमारे २० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
- अर्पिता मुखर्जी पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत.
- छाप्याबाबत ईडीने म्हटले आहे की, हा पैसा एसएससी घोटाळ्याशी संबंधित असल्याचा संशय आहे.
२ हजार आणि पाचशेच्या नोटांचा डोंगर !!
- नोटांची संख्या इतकी होती की, नोटा मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली.
- त्याच वेळी, ईडीने असेही सांगितले की अर्पिता मुखर्जीच्या परिसरातून २० हून अधिक मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत, ज्याचा उद्देश आणि वापर शोधला जात आहे.
- घटनास्थळी आढळलेल्या नोटांमध्ये २ हजार आणि पाचशेच्या नोटांचा डोंगर झाला आहे.
- ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ईडीने चटर्जी व्यतिरिक्त शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी, आमदार माणिक भट्टाचार्य आणि इतरांच्या घरावर छापे टाकले.
दोन मंत्र्यांच्या घरावर छापा:
- ईडीने आज सकाळी ७ वाजता पश्चिम बंगालचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांच्या घरावर छापा टाकला.
- राज्याचे दुसरे मंत्री परेशचंद्र अधिकारी यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले.
- याशिवाय ईडीने त्यांच्या अन्य १३ ठिकाणांवर छापे टाकले.