मुक्तपीठ टीम
श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडल्यानं तिथं आगडोंबही उसळला. प्रचंड महागाईची झळ श्रीलंकेला सोसावी लागत आहे. परंतु या परिस्थितीला जबाबदार कोण? याचे उत्तर अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख बिल बर्न्स यांनी दिलं आहे. श्रीलंकेत आलेल्या आर्थिक संकटाला त्यांनी चिनी मुत्सद्देगिरीला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, श्रीलंकेला चीनचा डाव समजू शकला नाही आणि चीनच्या जाळ्यात सापडला. यामुळे देशांनी यातून धडा घेतला पाहिजे.
चिनी कंपन्यांशी करार करताना डोळे उघडे ठेवा!
- बर्न्स म्हणाले की, चिनी कंपन्या आकर्षक ऑफर देऊन इतर देशांमध्ये मोठी गुंतवणूक करतात
- मात्र, आज श्रीलंकेसारख्या देशांची स्थिती पाहणे आवश्यक आहे.
- कारण त्यांच्यावर चीनच्या प्रचंड कर्जाचा दबाव असल्याचे म्हटले आहे.
- ही सर्व परिस्थिती लक्षात घेता जगभरातील देशांना चीनसोबत कोणताही करार करण्यापूर्वी डोळे उघडे ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
चीनने श्रीलंकेत काय केले?
- श्रीलंकेत चीनने मोठी गुंतवणूक केली.
- त्यांनी माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्यासह श्रीलंकेला कर्जाच्या सापळ्यात अडकवले.
- हंबनटोटा बंदराच्या विकासासाठी त्यांनी श्रीलंकेला मोठे कर्ज दिले.
- यानंतर, २०१७ मध्ये श्रीलंका चीनचे १.४ अब्ज डॉलरचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरले.
- यानंतर हे बंदर एका चिनी कंपनीला ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देणे भाग पडले.
- यासाठी चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनी (CEC) आणि चायना हायड्रो कॉर्पोरेशन यांनी संयुक्त उपक्रम केला.