मुक्तपीठ टीम
कष्टकरी आई-वडिल हे नेहमीच आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून मेहनत करत असतात. त्यात मुलींच्या आई-वडिलांवर तर एक मोठी जबाबदारी असते. तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची. वाढत्या महागाईत मुलांचे शिक्षणही महाग झाले आहे. अशा परिस्थितीत ज्यांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे, त्यांना ही योजना नक्कीच दिलासादायी ठरणार आहे.
केंद्र सरकारतर्फे मुलींसाठी राबविण्यात येणारी सुकन्या समृद्धी योजना ही अतिशय खास योजना आहे. सरकारच्या या योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना असे आहे. सुकन्या समृद्धी योजना ही इतर अनेक योजनांच्या तुलनेत खूपच चांगली मानली जाते. त्यावर जास्त व्याजही मिळतो. त्याच वेळी, जर या योजनेत मुलींसाठी दररोज काही पैसे वाचवून एकरकमी रुपये मिळतील.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे
- सुकन्या समृद्धी योजनेत इतर योजनांपेक्षा जास्त व्याज मिळतो.
- यामध्ये खूप कमी पैसे गुंतवल्यास मोठी रक्कम मिळते.
- जर इतर लहान बचत योजनांशी तुलना केली तर सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेल्या रकमेवर आयकरचीही सूट आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारला जात नाही.
सुकन्या समृद्धी योजनेत किती व्याज मिळते?
- सुकन्या समृद्धी योजना ही बचत योजना आहे.
- या अंतर्गत उघडलेल्या खात्यावर सध्या ७.६ टक्के दराने व्याज दिला जातो.
- मुलींसाठीच्या या विशेष योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुलगी १८ वर्षांची झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढता येते.
सुकन्या समृद्धी योजनेचं खाते कसे उघडावे?
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा व्यावसायिक बँकेच्या शाखेत खाते उघडता येते.
- या योजनेंतर्गत केवळ १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते उघडता येते.
- किमान २५० रुपये देऊन खाते उघडता येते.
- एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात.
- मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत योजनेचे खाते चालवता येते.
- जर मुलीचे वयाच्या २१ वर्षापूर्वी लग्न होत असेल तर हे खाते बंद करावे लागते.