मुक्तपीठ टीम
भारताच्या १६ व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात सोमवारी देशभरात मतदान झाले. राष्ट्रपती म्हणून एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा रिंगणात आहे. मतदानादरम्यानच एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश विधानसभेत क्रॉस व्होटिंग झाल्याचे समोर आले आहे. बरेलीतील भोजीपुरा येथून समाजवादी पक्षाचे आमदार शाहजील इस्लाम यांनी विरोधी पक्षातील यशवंत सिन्हा यांच्या जागी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शाहजील इस्लाम चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्या मालमत्तांवर बुलडोझरने कारवाई करण्यात आली होती.
शहजील यांनी पक्षाच्याविरोधात जाऊन मुर्मूंना केले मतदान!!
- भोजीपुरा येथून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर आमदार झालेल्या शाहजील इस्लाम यांनी क्रॉस व्होटिंग केले आहे.
- शहजील इस्लाम बरेलीचे समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. शहजील इस्लाम यांनी सातत्याने योगींवर टीका केली होती.
- त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर मालमत्तांवर कारवाई केली होती.
- शहजील यांच्या एका पेट्रोल पंपावरही बुलडोझर फिरवण्यात आला होता.
- अशी कारवाई करूनही पक्षाचा पाठिंबा न मिळाल्याने आमदार शाहजील इस्लाम यांनी पक्षाप्रती नाराजी दर्शवली होती.
- लखनौमधील अनेक सभांमध्येही सहभागी झाले नाहीत.
- एवढेच नाही तर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली.
- शहजील इस्लाम यांनी आजम खान यांनाही पाठिंबा दिला होता.
- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे.
- शहजील यांनी पक्षाच्याविरोधात जाऊन मुर्मू यांना मतदान केलं आहे.
शाहजील इस्लाम कोण आहेत?
- शाहजील इस्लाम बरेलीच्या भोजीपुरा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. शाहजील यांच्या वडिलांना निवडणूक लढवायची होती, परंतु जेव्हा फॉर्म नाकारला गेला तेव्हा त्यांनी आधीच शाहजीलची नोंदणी केली होती.
- त्यामुळे वडिलांच्या जागी शाहजील यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली.
- त्यांच्या वडिलांनी सपाच्या चिन्हावर नाव नोंदवले असल्याने, सपाने अपक्ष शाहजीलला पाठिंबा दिल्याने ते विजयी झाले.
- पुढच्या निवडणुकीत ते बसपामध्ये दाखल झाले आणि दुसऱ्या विधानसभेतील आमदार पुन्हा मंत्री झाले.