*मनोरंजन महत्त्व* : १) बिग बॉसच्या चौदाव्या सिझनचा ग्रॅण्ड फिनाले मोठ्या जल्लोषात पार पडला. चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळवत अभिनेत्री रुबीना दिलैक ही विजेता झाली. तिने चाहत्यांचे मनभरून आभार मानले. राहुल वैद्यला टक्कर देत रुबीनाने विजेते पदाची ट्रॉफी पटकावली आहे. २) तरूणाईंच्या मनावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या कार्तिकची आता पुन्हा एकदा धडाकेबाज एन्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘भुलभुलैया-2’च्या प्रदर्शनाची घोषणा झाली आहे. यात अक्षय कुमार नाही तर, कार्तिक असणार आहे. तसेच त्याच्यासोबच कियारा अडवाणी आणि तब्बू यादोघी मुख्य भूमिकेत आहेत. ३) आदेश बांदेकर यांच्या मुलाने कलाविश्वात पदार्पण करणार आहेल. स्टारकिड्सच्या यादीत आता अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाचे नावदेखील जोडले गेले आहे. आदेश बांदेकर निर्मित ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून सोहम बांदेकर मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे. ४) राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा ‘रुही’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात झळकणार आहे. हा सिनेमा हॉरर कॉमेडी असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आता या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. काही तासातचं या गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे. ५) कलर्स मराठीवरील लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे ‘चंद्र आहे साक्षीला’मधील श्रीधरने विश्वासघात केल्यानंतर संग्रामने स्वातीला मैत्रीचा आधार देत तिला सांभाळून घेतले. विशेष म्हणजे याच संग्रामसोबत आता स्वाती लग्नगाठ बांधणार असून दोघांच्या घरी लग्नाची धामधूम सुरु झाली आहे.