Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संभाजी भिडेंची संघटना का फुटली? शिव प्रतिष्ठानविरोधात युवा हिंदुस्थान!

February 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
choughule vs bhide

मुक्तपीठ टीम

संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये अखेर फूट पडली आहे. काही दिवसांपूर्वी कार्यवाहक पदावरून निलंबित करण्यात आलेल्या नितीन चौगुले यांनी वेगळी संस्था काढली आहे. राज्यातल्या शेकडो धारकऱ्याच्या उपस्थितीमध्ये शिवभक्ताचा मेळावा घेत ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थान संस्था’ ची घोषणा केली आहे. राजकारणविरहित हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच या संघटनेकडून राज्यभर काम केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

 

गेल्या काही महिन्यांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संभाजी भिडे गुरुजी यांच्या संघटनेमध्ये गृहकलह सुरू होता आणि यातून प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांचं निलंबन झाले होते. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. शहरातील माधवनगर रोडवर असलेल्या डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात चौगुले यांनी आपली भूमिका मांडत नव्या संघटनेची घोषणा केली .

चौगुले म्हणाले की, संभाजीराव भिडे यांच्या आदेशानुसार वीस वर्षापासून शिवप्रतिष्ठानमध्ये काम करत आलो आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता भिडे यांनी दिलेले कार्य करत आलो. या कालावधीत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिवप्रतिष्ठानचे काम वाढवले. २०१३ पासून पूर्णवेळ काम करताना गडकोट मोहिमेसह सर्व उपक्रम प्रभावीपण राबवले , भिडे यांनीही पूर्ण विश्वास व्यक्त केल्याने चांगले काम करू शकलो, मात्र संघटनेतील काही जणांना हे काम सहन न झाल्याने त्यांनी माझ्यावर आरोप सुरू केले. माझी बदनामी सुरूच ठेवताना त्यांनी शिवप्रतिष्ठानमधून निलंबन केले. संघटनेतून निलंबित केले तरी कार्यकर्त्यांच्या मनातून कोणीही निलंबित करू शकत नाही असं त्यांनी म्हटलं.

या मेळाव्यातून नितीन चौगुले यांनी शिवप्रतिष्ठान मधील काही व्यक्तींच्यामुळे आपल्यावर नाहक आरोप झाले. या मंडळींच्या मुळे भिडे गुरुजींच्या मनात आपल्या बद्दल गैरसमज पसरले आहेत, असं मत व्यक्त करत गुरुजींनी दिलेले विचार यापुढे घेऊन जाण्यासाठी आणि देशसेवा करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संस्था स्थापन करत असल्याचं जाहीर करत या संस्थेच्या माध्यमातून या पुढे आपलं कार्य सुरू राहील असं स्पष्ट केले आहे.

भिडे यांच्याबद्दल आदर कायम शिवप्रतिष्ठानमधून निलंबित करण्यात आले असले तरी संभाजी भिडे यांच्याविषयी आदर कायम असणार आहे, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच नवीन संघटनेचे काम असणार आहे, राजकारणविरहित कामास प्राधान्य देणार असल्याची माहिती नितीन चौगुले यांनी दिली.


Tags: sambhaji bhideनितीन चौगुलेशिवप्रतिष्ठानसंभाजी भिडे
Previous Post

*मनोरंजन महत्त्व* : १) बिग बॉसच्या चौदाव्या सिझनचा ग्रॅण्ड फिनाले मोठ्या जल्लोषात पार पडला. चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळवत अभिनेत्री रुबीना दिलैक ही विजेता झाली. तिने चाहत्यांचे मनभरून आभार मानले. राहुल वैद्यला टक्कर देत रुबीनाने विजेते पदाची ट्रॉफी पटकावली आहे. २) तरूणाईंच्या मनावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या कार्तिकची आता पुन्हा एकदा धडाकेबाज एन्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘भुलभुलैया-2’च्या प्रदर्शनाची घोषणा झाली आहे. यात अक्षय कुमार नाही तर, कार्तिक असणार आहे. तसेच त्याच्यासोबच कियारा अडवाणी आणि तब्बू यादोघी मुख्य भूमिकेत आहेत. ३) आदेश बांदेकर यांच्या मुलाने कलाविश्वात पदार्पण करणार आहेल. स्टारकिड्सच्या यादीत आता अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाचे नावदेखील जोडले गेले आहे. आदेश बांदेकर निर्मित ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून सोहम बांदेकर मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे. ४) राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा ‘रुही’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात झळकणार आहे. हा सिनेमा हॉरर कॉमेडी असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आता या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. काही तासातचं या गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे. ५) कलर्स मराठीवरील लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे ‘चंद्र आहे साक्षीला’मधील श्रीधरने विश्वासघात केल्यानंतर संग्रामने स्वातीला मैत्रीचा आधार देत तिला सांभाळून घेतले. विशेष म्हणजे याच संग्रामसोबत आता स्वाती लग्नगाठ बांधणार असून दोघांच्या घरी लग्नाची धामधूम सुरु झाली आहे.

Next Post

सोनम वांगचूक यांच्या तंबूच्या शोधाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कौतुक

Next Post
Sonam Wangchuck

सोनम वांगचूक यांच्या तंबूच्या शोधाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!