Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जाती आधारित जनगणनेमुळे प्रत्येक जातीला संख्येनुसार वाटा – रामदास आठवले

February 22, 2021
in सरकारी बातम्या
0
ramdas athwle

मुक्तपीठ टीम

मराठा समाजाला एस सी एस टी ओबीसींच्या कोट्यातून नाही तर स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. सवर्ण समाजातील गरिबांना १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकार ने केला आहे. त्यात आता जोड देऊन देशातील मराठा; राजपूत आदी क्षत्रिय समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली असल्याचे सांगत आगामी जण गणना ही जाती आधारित करावी; जातीनिहाय जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार न्याय वाटा मिळेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. विक्रमगड च्या दिवेकर वाडी येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आदिवासी बहुजन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात रामदास आठवले यांनी मागर्दशन केले.

 

पालघर तालुक्यात ८ तालुके दुर्गम आहेत.त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे.येथे मनरेगा चे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकार मे अद्याप वेतन दिलेले नाही ही चुकीची बाब आहे.राज्यातील महाविकास आघाडी चे सरकार काही कामाचे नाही.. उद्धवजींचे सरकार नाही रामाचे .. नाही भिमाचे .. नाही काही कामाचे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
पालघर जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी होत असून त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणार असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले. येत्या २५ फेब्रुवारीला संपूर्ण देशात गरीब भूमिहीनांसाठी ५ एकर जमीन देण्यात यावी या मागणीसाठी रिपाइं तर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी दिली.

 

आरपीआय आणि कुणबी सेना एकत्र अली तर भविष्यात राज्यात मोठी सामाजिक आणि राजकीय क्रांती होईल असे प्रतिपादन यावेळी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केले.


Tags: ramdas athwaleRPIआरपीआयपंतप्रधान नरेंद्र मोदीरामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष
Previous Post

#व्हाअभिव्यक्त! शिक्षणाची कक्षा आणि कक्षेचे शिक्षण

Next Post

*मनोरंजन महत्त्व* : १) बिग बॉसच्या चौदाव्या सिझनचा ग्रॅण्ड फिनाले मोठ्या जल्लोषात पार पडला. चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळवत अभिनेत्री रुबीना दिलैक ही विजेता झाली. तिने चाहत्यांचे मनभरून आभार मानले. राहुल वैद्यला टक्कर देत रुबीनाने विजेते पदाची ट्रॉफी पटकावली आहे. २) तरूणाईंच्या मनावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या कार्तिकची आता पुन्हा एकदा धडाकेबाज एन्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘भुलभुलैया-2’च्या प्रदर्शनाची घोषणा झाली आहे. यात अक्षय कुमार नाही तर, कार्तिक असणार आहे. तसेच त्याच्यासोबच कियारा अडवाणी आणि तब्बू यादोघी मुख्य भूमिकेत आहेत. ३) आदेश बांदेकर यांच्या मुलाने कलाविश्वात पदार्पण करणार आहेल. स्टारकिड्सच्या यादीत आता अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाचे नावदेखील जोडले गेले आहे. आदेश बांदेकर निर्मित ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून सोहम बांदेकर मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे. ४) राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा ‘रुही’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात झळकणार आहे. हा सिनेमा हॉरर कॉमेडी असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आता या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. काही तासातचं या गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे. ५) कलर्स मराठीवरील लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे ‘चंद्र आहे साक्षीला’मधील श्रीधरने विश्वासघात केल्यानंतर संग्रामने स्वातीला मैत्रीचा आधार देत तिला सांभाळून घेतले. विशेष म्हणजे याच संग्रामसोबत आता स्वाती लग्नगाठ बांधणार असून दोघांच्या घरी लग्नाची धामधूम सुरु झाली आहे.

Next Post

*मनोरंजन महत्त्व* : १) बिग बॉसच्या चौदाव्या सिझनचा ग्रॅण्ड फिनाले मोठ्या जल्लोषात पार पडला. चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळवत अभिनेत्री रुबीना दिलैक ही विजेता झाली. तिने चाहत्यांचे मनभरून आभार मानले. राहुल वैद्यला टक्कर देत रुबीनाने विजेते पदाची ट्रॉफी पटकावली आहे. २) तरूणाईंच्या मनावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या कार्तिकची आता पुन्हा एकदा धडाकेबाज एन्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘भुलभुलैया-2’च्या प्रदर्शनाची घोषणा झाली आहे. यात अक्षय कुमार नाही तर, कार्तिक असणार आहे. तसेच त्याच्यासोबच कियारा अडवाणी आणि तब्बू यादोघी मुख्य भूमिकेत आहेत. ३) आदेश बांदेकर यांच्या मुलाने कलाविश्वात पदार्पण करणार आहेल. स्टारकिड्सच्या यादीत आता अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाचे नावदेखील जोडले गेले आहे. आदेश बांदेकर निर्मित ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून सोहम बांदेकर मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे. ४) राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा ‘रुही’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात झळकणार आहे. हा सिनेमा हॉरर कॉमेडी असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आता या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. काही तासातचं या गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे. ५) कलर्स मराठीवरील लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे 'चंद्र आहे साक्षीला'मधील श्रीधरने विश्वासघात केल्यानंतर संग्रामने स्वातीला मैत्रीचा आधार देत तिला सांभाळून घेतले. विशेष म्हणजे याच संग्रामसोबत आता स्वाती लग्नगाठ बांधणार असून दोघांच्या घरी लग्नाची धामधूम सुरु झाली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!