मुक्तपीठ टीम
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात आयटीआय अॅप्रेंटिस, सेक्रेटरिअल असिस्टंट, डिप्लोमा अप्रेंटिस, पदवीधर अॅप्रेंटिस, एचआर एक्झिक्युटिव्ह, सीएसआर एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्ह लॉ अशा एकूण १, १६६ या जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- इलेक्ट्रिकल या विषयात आयटीआय
- पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) स्टेनोग्राफी/ सचिवीय/ व्यावसायिक सराव किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
- पद क्र.३- इलेक्ट्रिकल/ सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.४- सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी या विषयात बी.ई./ बी.टेक/ बी.एससी इंजिनीअरिंग
- पद क्र.५- एचआर/ एमएसडब्ल्यू/ पर्सोनेल मॅनेजमेंट/ कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध पीजी डिप्लोमा या विषयात एमबीए
- पद क्र.६- एमएसडब्ल्यू/ ग्रामीण विकास/ व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
- पद क्र.७- १) पदवीधर २) एलएलबी केलेलं असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.powergrid.in/ वरून माहिती मिळवू शकता.