मुक्तपीठ टीम
सध्या आधार कार्ड नसेल तर चालतच नाही, अशीच स्थिती आहे. अनेकदा त्याबाबतीत उलट-सुलट माहिती येते आणि गोंधळ अधिकच वाढतो. बँकेत खाते उघडायचे असो, क्रेडिट कार्ड घ्यायचे असो, कर्ज घ्यायचे असो किंवा इतर सरकारी-निमसरकारी कामे करायची असो. यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड आवश्यक आहे. आता तर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे देखील अनिवार्य आहे, अन्यथा अनेक कामे अडकतात. काहीवेळा दंड भरावा लागू शकतो. पण सर्वांसाठीच आधार-पॅन लिंक करणे अनिवार्य आहे का? कोणासाठी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य नाही याविषयी अधिक जाणून घेऊया…
लिंक नाही केलं तर काय नुकसान होणार?
- पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते
- दंड आकारला जाऊ शकतो
- निष्क्रिय पॅन कार्डमुळे, TDS किंवा DCSवर जास्त पैसे कापले जातील.
- ५० हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार आणि त्याच रकमेपेक्षा जास्तीची एफडी घेता येणार नाही
- क्रेडिट आणि डेबिट कार्ड बनवता येणार नाहीत आणि कर्ज घेताना अडचणी येऊ शकतात.
कोणासाठी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य नाही?
- ज्यांच्याकडे आधार कार्ड, आधार क्रमांक किंवा नावनोंदणी आयडी नाही.
- जे लोक आयकर कायदा १९६१ च्या आधारे अनिवासी आहेत.
- वय ८० वर्षे किंवा त्याहून अधिक असल्यास
- गेल्या वर्षी ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक.
- जे लोक भारताचे नागरिक नाहीत