मुक्तपीठ टीम
सीमेवर प्रतिकुल हवामानात देशाच्या संरक्षणासाठी बीएसएफ जवान तैनात असतात. कमालीच्या थंड अगदी वजा तापमानात, शत्रूंशी सामना करत जवान आपलं कर्तव्य चोख बजावत असतात. आता पहिल्यांदाच सीमेवर बीएसएफच्या फॉरवर्ड लोकेशन पोस्टवर सर्व हवामानातील प्रभावी कंटेनर बसवले जात आहेत. पाकिस्तानकडून केव्हाही गोळीबार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे कंटेनर लावले जात आहेत. सध्या ११५ कंटेनर तयार करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांनी सुसज्ज आहे. प्रभावी संपर्क यंत्रणाही उपलब्ध आहे. सोलर पॅनलचीही सोय आहे. वजनाने हलके असल्याने ते एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवताही येतात.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, एलओसीला लागून असलेली बीएसएफची फॉरवर्ड पोस्ट हिवाळ्यात खूप थंड असते. विशेषतः हिवाळ्यात येथील तापमान मायनस ३०-४० पर्यंत जाते. कडाक्याच्या थंडीपासून बीएसएफच्या जवानांचे संरक्षण करण्यासाठी विशेष प्रकारचे कंटेनर लावण्यात येत आहेत. याद्वारे जवानांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण मिळणार आहे.
हवामान कंटेनर बसवण्यासाठी ५० कोटी रूपये खर्च
- ५० कोटी रुपये खर्चून बसवण्यात आलेल्या या कंटेनरमध्ये सैनिकांच्या प्रत्येक सुविधेची काळजी घेण्यात आली आहे.
- “जेव्हा बाहेरचे तापमान मायनसपेक्षा खूप खाली असेल, तेव्हाही कंटेनरच्या आत बसलेल्या जवानाला कडाक्याच्या थंडीचा अजिबात त्रास होणार नाही आणि ते त्यात आरामात राहू शकतील.
कंटेनरच्या आत स्वयंपाकघर आणि शौचालयाची व्यवस्था
- कंटेनरच्या आत स्वयंपाकघर आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामुळे जवानाला बाहेर येण्याची गरज भासणार नाही.
- अधिकाऱ्याने सांगितले की, एलओसीच्या फॉरवर्ड लोकेशन पोस्टवर पाकिस्तानकडून गोळीबार होण्याची शक्यता आहे.
- पाकिस्तानकडून होणारा गोळीबार टाळण्यासाठी हे सर्व कंटेनर अशा ठिकाणी बसवले जात आहेत, जे पाकिस्तानच्या चौकीवर बसलेले सैनिक पाहू शकत नाहीत.
सैनिकांच्या सुविधांमध्ये सातत्याने वाढ
- हे लक्षात घेण्यासारखे आहे की बीएसएफ आणि लष्कर सुमारे ३४४ किमी विस्तारलेल्या नियंत्रण रेषेवर म्हणजेच एलओसीवर तैनात आहेत, जे एकत्रितपणे एलओसीवर लक्ष ठेवतात.
- एलओसीवर बीएसएफच्या १६४ फॉरवर्ड डिफेन्स लोकेशन पोस्ट आहेत.
- अधिकाऱ्याने सांगितले की, जवानांच्या सुविधांमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे.
- विशेषत: दुर्गम भागात सैनिकांच्या सोयीसाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
- कठीण काळातही समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.