मुक्तपीठ टीम
१ जुलै २०२२ पासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. १ जुलैपासून एलपीजी गॅसची किंमत, आधार-पॅन लिंक, क्रिप्टोकरन्सीवर टीडीएसमध्ये बदल केले जात आहेत. यासाठी सतर्क व्हा आणि आवश्यक असणारी माहिती जाणून घेऊन योग्य ते कार्य करा.
स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत वारंवार होणारे बदल
- घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात.
- एलपीजी गॅसची किंमत दर महिन्याच्या १ तारखेला निश्चित केली जाते.
- १ जुलैपासून एलपीजीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पॅन-आधार लिंकसंबंधित आवस्यक सूचना
- पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करण्याबाबत सरकारने आधीच अलर्ट जारी केला आहे.
- लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे.
- जर आत्तापर्यंत पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर लगेच करा, अन्यथा ३० जूननंतर मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.
- यामुळे पॅन कार्डही ब्लॉक होऊ शकते आणि मोठा दंडही भरावा लागू शकतो.
डीमॅट अकाउंट त्वरित अपडेट करण्याच्या सूचाना
शेअर मार्केटशी संबंधित असणारे डिमॅट अकाउंट ३० जूनपूर्वी अपडेट करा. जर केवायसी केले नसेल, तर अकाउंट बंद केले जाऊ शकते.
क्रिप्टोकरन्सीवर टीडीएस
- वित्त कायदा २०२२ ने प्राप्तिकर कायद्यामध्ये कलम १९४एस जोडले आहे, ज्या अंतर्गत १ जुलैपासून एका वर्षात डिजिटल मालमत्ता किंवा १० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या क्रिप्टोकरन्सीच्या पेमेंटवर एक टक्का कर वजा केला जाईल.
- सीबीडीटीने सूचित केले की कलम १९४एस अंतर्गत जमा केलेला टीडीएस त्या महिन्याच्या अखेरीपासून ३० दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक आहे.
- त्यामुळे कापलेला कर २६क्यूई स्टेटमेंट फॉर्ममध्ये चालानसह जमा केला जाईल.