मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या या राजकारणात आता तृणमूल काँगेसनेही उडी मारली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांसोबत आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते भाजपाविरोधात आंदोलन करत आहेत. आसाममध्ये पूरस्थिती असल्याने लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र भाजपा सरकार महाराष्ट्रातील लोकांचं आदरातिथ्य करण्यात गुंतंलं आहे, असा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
गुवाहाटीमध्ये हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचं आंदोलन!!
- आसाममध्ये आलेल्या पूरामध्ये आसामच्या नागरिकांचे हाल सुरू आहेत.
- महाराष्ट्रातील राजकीय नाट्याची चिंता न करता आसाम सरकारने राज्यातील नागरिकांची चिंता करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
- हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये शिवसेना आमदारांचा घोडेबाजार सुरू आहे.
- त्यासाठी कोट्यवधींचा चुराडा होत आहे.
- त्यांच्यावर खर्च करण्याऐवजी सरकारने पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली.
- केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने आसामच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडले असल्याचे त्यांनी म्हटले.
नेमकं काय घडलं?
- गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानकपणे हॉटेल रॅडिसन्स बाहेर घोषणाबाजी सुरू केली.
- त्यामुळे गोंधळ उडाला.
- कोणाताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेले पोलीस सतर्क झाले.
- आसाम सरकारविरोधात आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी त्वरीत ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
- हॉटेलमध्ये शिरण्याचा आमचा इरादा नाही.
- मात्र, केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारचे आसाममधील पूरस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.