मुक्तपीठ टीम
सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. अपात्र आणि राजीनामा दिलेल्या सदस्यांना पुढील निवडणूक लढवण्यासाठी ५ वर्षांची बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच यासंबंधी प्रलंबित प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
जया ठाकूर यांच्या याचिकेमध्ये काय म्हटलं आहे?
- राजकीय पक्षांनी देशात एक नवा ट्रेंड विकसित केला आहे.
- सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आमीष दाखवून राजीनामा देण्यास भाग पाडले जाते आणि सरकार पाडले जाते.
- राजीनामा देणाऱ्या आमदारांना नवीन सरकारकडून मंत्रीपदे दिली जातात. तसेच, पोटनिवडणूक लढवण्यासाठी तिकिटही दिले जात असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.
राज्यातील राजकीय वाद सर्वोच्च न्यायालयात!
- सरन्यायाधीश एस.ए.बोबडे आणि न्यायमूर्ती ए.एस.बोपण्णा आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने या प्रकरणी नोटीस बजावली होती.
- यासंबंधी कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही किंवा या अगोदर तशा संबंधीचा दिशादर्शक कायदा करण्यात आला नसल्याने त्याचा राजकीय पक्षांकडून गैरफायदा घेतला जातो आणि वेगवेगळ्या राज्यातील जनतेने निवडून दिलेले सरकार पाडले जाते.
- महाराष्ट्रातही अशाच प्रकारची घटना घडण्याची शक्यता आहे.
- राजकीय पक्षांकडून आपल्या देशातील लोकशाहीला धोका पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो.
- त्यामुळे या गोष्टी रोखण्यासाठी न्यायालयाने लवकरात लवकर पाऊले उचलायला हवीत.
- राज्यघटनेतील दहाव्या अनुसूचीप्रमाणे सभागृहातील एखाद्या सदस्याला निलंबित केले गेले तर त्याला पुढील कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी.