मुक्तपीठ टीम
मारुती सुझुकीच्या कॉम्पॅक्ट एसयुव्ही ब्रेझाच्या नवीन वर्झनसाठी बुकिंग सुरू झाली आहे. अकरा हजार रुपयांमध्ये ते करता येईल. कंपनीच्या कोणत्याही अरिना शोरूममधून किंवा वेबसाइटवरून नवीन ब्रेझा बुक करू शकतात. ब्रेझा नवीन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक सनरूफ सारख्या फिचर्ससह लाँच होत आहे.
२०२२ मारुती सुझुकी ब्रेझामध्ये कोणते नवीन फिचर्स?
- ब्रेझामध्ये ६ एअर बॅग्स आहेत
- नवीन मारुती सुझुकी ब्रेझामध्ये अँगुलर हेडलॅम्प डिझाइन आणि स्टायलिश डेटाइम रनिंग लाइट्स आहेत.
- एसयुव्हीला एक नवीन ग्रील, बंपर, हेडलॅम्प आणि बोनेट आहे.
- मागील बाजूस, टेलगेट होरिजोन्टल रॅपराउंड टेल-लॅम्प आहे.
- नवीन ब्रेझामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ आहे.
२०२२ मारुती सुझुकी ब्रेझा इंटीरियर फिचर्स
- ब्रेझाच्या नवीन डॅशबोर्ड डिझाइनमध्ये ९-इंचाची टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि हेड्स-अप डिस्प्ले यांसारखे फिचर्स आहेत.
- नवीन ब्रेझाला दोन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट पर्याय आहेत.
- नवीन ब्रेझा ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येईल
- मारुती सुझुकी येत्या काही महिन्यांत सीएनजी आधारित वजर्न सादर करणार आहे.
२०२२मारुती सुझुकी ब्रेझा इंजिन, गिअरबॉक्स पर्याय
- नवीन ब्रेझामध्ये K15C इंजिन उपलब्ध असेल.
- हे इंजिन Ertiga आणि XL6 सह सादर करण्यात आले होते.
- हे इंजिन १०३hp आणि १३६Nm जनरेट करते आणि ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाईल.
- या इंजिनमध्ये माईल्ड-हायब्रिड इंधन बचत तंत्रज्ञानही उपलब्ध आहे.
नवीन ब्रेझा ३० जूनला होणार लाँच
- नवीन ब्रेझा कॉम्पॅक्ट एसयुव्हीची किंमत ह्युंडाई वेन्यु, किआ सोनेट, टाटा नेक्सोन, निस्सान मेगनाईट आणि रेनॉ किगर पेक्षा कमी असेल अशी अपेक्षा आहे.