मुक्तपीठ टीम
IREL (India) लिमिटेडमध्ये फायनान्स पदवीधर ट्रेनी, एचआर पदवीधर ट्रेनी, टेक्निकल/ माइनिंग/ केमिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात डिप्लोमा ट्रेनी, ज्युनियर सुपरवाइजर, पर्सनल सेक्रेटरी, फिटर/ इलेक्ट्रिशियन/ अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट/ इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात आयटीआय ट्रेड्समन ट्रेनी वेस्टर्न या पदांसाठी एकूण ९२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- सीए इंटरमीडिएट/ सीएमए इंटरमीडिएट किंवा ६०% गुणांसह बी.कॉम
- पद क्र.२- ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.३- ६०% गुणांसह माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा
- पद क्र.४- १) हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी २) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.५- १) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी २) इंग्रजी टायपिंग ३) एमएस ऑफिस ४) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण+आयटीआय/ एनएसी (फिटर/ इलेक्ट्रिशियन/ अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट/ इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा ५०% गुणांसह केमिस्ट्री विषयातून १२वी उत्तीर्ण २) ०२ वर्षे अनुभव उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ४७२ रूपये शुल्क आकारले जाणार आहे तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.irel.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.