मुक्तपीठ टीम
महिंद्रा नवीन इलेक्ट्रिक रेंज कार सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सूचित केले की तीन नवीन मॉडेल्स EV विभागात सामील होतील आणि ते “बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन” म्हणून ओळखले जाईल. कंपनीन १५ ऑगस्ट रोजी ही कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. महिंद्राने आपल्या एका मॉडेलचा टीझर जारी केला आहे, ज्याचे नाव XUV900 Coupe आहे. Mahindra Advanced Design Europe (MADE) येथे डिझाईन केलेली ही SUV केवळ इलेक्ट्रिकच नाही तर ती जागतिक SUV देखील असेल.
- SUV ला फ्युचरिस्टिक स्टीयरिंग व्हीलच्या मागे एक मोठी स्क्रीन आणि फायटर जेट कॉकपिट आहे.
- एसयूव्हीला एरोडायनामिक व्हील देखील दिली आहेत ज्यामुळे हवेचा प्रतिकार कमी होईल.
- कारमध्ये विशेष सी-आकाराचे एलईडी लाईट्स आहेत, जे बोनेटवर एलईडी स्ट्रिपला जोडलेले आहेत.
- SUV ला रेझर-शार्प बॉडी पॅनेल्स, स्टार-आकाराची व्हील्स, ३-डोर डिझाइन कॉन्फिगरेशन, एक स्लीक स्टीयरिंग व्हील, लँडस्केप ओरिएंटेड डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अॅडजस्टेबल हेडरेस्ट, बकेट सीट्स आहेत.
- बॉडी क्लेडिंग, स्क्वेरिश व्हील आर्च, मोठ्या एअर व्हेंट्स, रुफ माउंटेड स्पॉयलर देखील आहे.
- फोक्सवॅगनसोबतच्या कराराचा एक भाग म्हणून, बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन एसयूव्हीला फोक्सवॅगनचे इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी सेल आणि बॅटरी सिस्टीम यासारखे भाग पुरवले जाऊ शकतात.