मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे. पंतप्रधान मोदी प्रथम जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर आणि मूर्तीच्या लोकर्पाण सोहळ्यासाठी पुण्यातील देहूत येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी हे मुंबईतील कार्यक्रमांसाठी रवाना होतील. पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा कसा असेल हे जाणून घेऊया…
असा असेल पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा
- दुपारी १२
देहू येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण करतील. - सायंकाळी ४.४५
पंतप्रधान मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं लोकार्पण करतील. - संध्याकाळी ६
पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचार या गुजराती दैनिकाच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.
पंतप्रधान मोदींचा देहू दौरा!
- नरेंद्र मोदींच्या हस्ते आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
- आज दुपारी साधारण १२ च्या सुमारास पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण करणार आहेत.
- त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत.
- साधारण दीड ते दोन तास हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.
- या कार्यक्रमासाठी ५० हजारांच्या आसपास वारकरी येणार असल्याचे संस्थानाकडून सांगण्यात आले आहे.
- याशिवाय पंतप्रधानांना देण्यासाठी संस्थांकडून खास पगडी तयार करण्यात आली आहे.
- पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला आहे.
- तसेच, स्वच्छता आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
- सध्या मंदिर परिसरात फक्त पास धारकांनाच प्रवेश दिला जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते जल भूषण इमारत आणि क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन!
- यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील.
- जल भूषण इमारत हे १८८५ सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे.
- जुनी इमारत पाडून नवी इमारत बांधण्यात आली आहे.
- सन २०१६ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते.
- शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटिश या भुयाराचा उपयोग करत होते.
- २०१९ साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले.
- या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय असून मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे.
पंतप्रधान द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार!
- पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचार या गुजराती दैनिकाच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होतील.
- हे वृत्तपत्र गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे.
- या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाईल.