मुक्तपीठ टीम
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आज दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. ईडीकडून राहुल गांधी यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान ईडीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.प्रियंका गांधी या देखील ईडीच्या कार्यलयावर काढलेल्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. देशभरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ‘सच झुकेगा नही’च्या घोषणा देत आहेत. महाराष्ट्रातही काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.
राहुल गांधींवर आलेलं ईडी समन्स ही आपत्ती न मानता काँग्रेसनं थंडावलेल्या पक्ष संघटनेला आक्रमक बनवण्याची संधी मानल्याचं दिसत आहे.मार्चमध्ये झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते हताश झाले आहेत. याप्रसंगी काँग्रेसची एकता दाखवण्याचा प्रयत्न पक्षाकडून दाखवण्यात येत आहे.इतकंच नाही तर कुटुंबही यावेळी एकत्र दिसत आहे.प्रियंका गांधी आपल्या भावाच्या घरी पोहोचल्या आहेत, तर रॉबर्ट वाड्रा यांनीही ट्विट करून राहुल गांधींचे सांत्वन केले आहे. त्याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, मलाही ईडीने अनेक समन्स बजावले होते, पण मी सर्वांची उत्तरे दिली.
२५ राज्यांत काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन!
- काँग्रेसला एकता आणि ताकद दाखवण्याची संधी!
- काँग्रेसकडून देशभरातील २५ ईडी कार्यालयांबाहेर आंदोलन करण्यात येत आहे.
- गांधी कुटुंबाविरुद्ध षडयंत्र आणि राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.
- शिवाय केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही काँग्रेस करत आहे.
- काँग्रेस गांधी कुटुंबावरील आरोप चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
- याशिवाय याकडे एकता आणि ताकद दाखवण्याची संधी म्हणूनही पाहिले जात आहे.