अक्षय नलवडे
साताऱ्याचे ५० प्रशिक्षणार्थी मनाली येथे गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. परत येतांना त्यांच्या बसला अपघात झाला. दिल्लीवरुन निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस चुकल्याने केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांची तात्काळ व्यवस्था करुन त्यांना साताऱ्याला पोहचवले. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मदतीचा हात दिला.
मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील ५० प्रशिक्षणार्थी असलेल्या बसचा अपघात झाला होता. प्रशिक्षण संपून माघारी येत असताना मंडी परिसरात हा अपघात झाला. एकूण ५० जण प्रशिक्षणासाठी साताऱ्यातून रेस्क्यू ऑपरेशनच्या ट्रेनिंगसाठी हिमाचल प्रदेश मध्ये गेले होते. प्रशिक्षण संपून परत येतांना मनाली येथील मंडी परिसरात त्यांच्या बसला अपघात झाला होता. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट येथे ट्रेनिं साठी साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्समधून ५० जण या ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले होते. चार आठवड्यांचे ट्रेनिंग संपल्यानंतर माघारी येत असताना दुसऱ्या बसने साताऱ्याच्या प्रशिक्षणार्थी असलेल्या बसला समोरून धडक दिल्याने चालक गंभीररीत्या जखमी झाला. बसमधील इतर पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ट्रेकर्स टीममधील सर्व सदस्य हे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या तत्परतेमुळे दिल्लीवरुन निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसने सातार्याच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्या सुखरुप घरी पोहचण्याची सोय झाली. राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या या तत्परतेमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यानंतर हे सर्व साताऱ्याला घरी पोहचेपर्यंत रावसाहेब दानवे त्यांच्या संपर्कात होते व त्यांनी या गिर्यारोहकांना सर्व प्रकारचे सहकार्य केले.
दानवेंना तत्परतेनं मदतीसाठी धन्यवाद!
सातारा जिल्ह्यातील ५० युवक गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी अटल बिहारी माउंटन इन्स्टिट्युट,मनाली याठिकाणी ११ मे रोजी गेले होते. २६ दिवसांचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर दिनांक ५ जूनला मनालीवरून प्रशिक्षणार्थी लक्झरी बसमधून परतीचा प्रवासाला निघालेले असताना मंडीपासून ७० किमी अंतरावर बिसापुर येथील घाटात पहाटे साडेचार वाजता बसला अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. सर्व प्रशिक्षाणार्थी सुखरूप होते. या संकट काळात आम्हाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आम्हाला तत्काळ रेल्वेच्या प्रवासाची तिकीट बूक करून दिली आणि आम्हाला आमच्या घरी सुखरूप पोहचविण्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न केले. आमच्या सर्वांची विचारपूस केली.आम्हाला सहकार्य केलं व अडचणीच्या काळी मदत केली या बद्दल आम्ही मा रावसाहेब दानवेसाहेबांच्या आभार व्यक्त करतो.
अक्षय नलवडे ,प्रशिक्षणार्थी लीडर पाटण,सातारा