Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जलपर्णींच्या विळख्यातून ज्वेल ऑफ नवी मुंबई तलावाची सुटका, पर्यावरण योद्ध्यांचा लढा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Environment Life Foundation

मुक्तपीठ टीम

एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे नवी मुंबई परिसरात पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत आहे. धर्मेश बाराई यांनी स्थापन केलेल्या या संस्थेनं स्थानिक नागरिक, स्थानिक मनपा आणि इतर यंत्रणांच्या सहकार्यानं पर्यावरण रक्षणासाठी सतत, निरंतर कार्य सुरु ठेवलं आहे. यातील नवं काम आहे. नेरुळ परिसरातील ज्वेल ऑफ नवी मुंबई या तलावाच्या स्वच्छतेचं काम. सीवूड्स आणि नेरुळसाठी त्या परिसरातील तलाव महत्वाचे आहेत. मात्र, गेली काही वर्षे या तलावांमध्ये जलपर्णीचा प्रादूर्भाव वाढला. जलपर्णीमुळे तलावातील पाण्याचा जिवंतपणा कमी होऊ लागला. जलपर्णीमुळे पाण्यात खाली सूर्यप्रकाश जात नाही. पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यात डासांचा प्रादूर्भाव वाढतो. त्यामुळे परिसरासाठी हा तलाव वरदानापेक्षा शाप ठरु लागला. तक्रारी येताच एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशनने स्थानिकांना आवाहन केले. त्या आवाहनानुसार सूर्योदय बँक, टीएस चाणक्य, पुनर्वशु फाउंडेशन, डिव्हाईन फाउंडेशन, NMMC ग्राउंड स्टाफ, रोट्रॅक्ट क्लब, इनर व्हील क्लब आणि स्थानिक नागरिक पुढे सरसावले.

Environment Life Foundation

यासर्वांनी एकत्र येत तलावातून जलपर्णी काढण्यास सुरुवात केली. पहिल्याच टप्प्यात २००हून अधिक स्वयंसेवकांसह सुमारे ३ ट्रक जलपर्णी काढण्यात आले.

तलावाच्या स्वच्छतेमुळे जलजीवन चांगले होऊन पक्ष्यांच्या प्रजातींना फायदा होतो. नैसर्गिक जैवविविधता वाढते. त्यांना सुरक्षित अधिवास मिळू शकतो. तसेच परिसरातील भूजल वाढण्यास मदत होते.

Environment Life Foundation

एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशनचे संस्थापक धर्मेश बाराई यांनी जलशक्ती मंत्रालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्व पाणथळ जागा आणि जलस्रोतांचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी जलाशयांचे संवर्धन करणे, आवश्यक असून एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशन त्यासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी ‘मुक्तपीठ’ शी बोलताना सांगितले.

Environment Life Foundation

तलाव स्वच्छतेत सहभागी पर्यावरणवीर!

  • अमन गुप्ता
  • रोहित ढोले
  • राहुल रासकर
  • भव्य पुजारी
  • विजयश्री शिंदे
  • सौम्या मेंडा
  • सोहन भोसले
  • प्रशांत पी.आर
  • दीपक पोतदार
  • तृप्ती बाराई
  • राहुल संखे
  • उषा संखे
  • प्रीती तेलंग
  • विद्या कौटिन्हो
  • त्रिशा दुआ
  • पंकज
  • तनुजा कोल्हे
  • स्नेहल कनोजिया
  • पियुष ओझरकर
  • पुनर्वसु फाउंडेशन
  • टीएस चाणक्य पदाधिकारी आणि कर्मचारी
  • स्थानिक नागरिक
  • विजय नाईक, अजित तांडेल या नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांंनीही या तलाव स्वच्छता मोहिमेत महत्वाची कामगिरी बजावली.

 

World Environment Day
Week 94 #MangrovesCleanup Drive team working towards wetland and water conservation.
200+ volunteers removed 3 trucks of Water Hyacinth from Merul Jewel of Navi Mumbai Lake.@MoJSDoWRRDGR @moefcc @MahaEnvCC @swachhbharat @mpcb_official @NMMCCommr @sunnyagro pic.twitter.com/Z53uYfm39x

— Environment Life Foundation (@EnvironmentLife) June 5, 2022

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Environment Life FoundationEnvironmental Warriorgood newsJalparniJewel of Navi Mumbai Lakemuktpeethएन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशनचांगली बातमीजलपर्णीज्वेल ऑफ नवी मुंबई तलावपर्यावरण योद्धामुक्तपीठ
Previous Post

प्रदीप भिडे यांचं निधन: टीव्ही बातम्यांमधील एक पर्व संपलं…

Next Post

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करणाऱ्या १७ उद्योजकांचा ‘ब्रॅण्ड महाराष्ट्राचा’ने सन्मान

Next Post
Brand Maharashtra award

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करणाऱ्या १७ उद्योजकांचा 'ब्रॅण्ड महाराष्ट्राचा’ने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!