मुक्तपीठ टीम
पुणतांबा येथील सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं आहे. १ जून पासून पुणतांबा येथील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला होता. अखेर आंदोलनाच्या चौथ्या दिवशी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर पुणतांबा येथील शेतकरी आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
आंदोलनाला तूर्तास स्थगिती…
- शनिवारी चौथ्या दिवशी कृषिमंत्री भुसे यांनी पुणतांब्यात येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.
- प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चेत प्रत्येक मागणीवर विचार करण्यात आला.
- या मागण्या सरकारमधील विविध विभागांशी संबंधित आहेत.
- त्यामुळे या विषयावर मुंबईत संयुक्त बैठक घेण्याचं ठरवण्यात आलं आहे.
- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधित विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकऱ्यांसोबत मंगळवारी ७ जूनला ही बैठक होणार आहे.
- यासाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.
- हा तोडगा आंदोलक शेतकऱ्यांनीही मान्य केला.
- मंगळवारची बैठक होईपर्यंत सध्या सुरू असलेले आंदोलनही तूर्त स्थगिती करण्यात आलं आहे.
- मंगळवारी होणाऱ्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
या मागण्यासंबंधी राज्य सरकार सकारात्मक- दादाजी भुसे
- आंदोलनच्या चौथ्या दिवशी कृषिमंत्री भुसे यांनी पुणतांब्यातील शेतकऱ्यांशी चर्चा केली.
- या मागण्यांसंबंधी राज्य सरकार सकारात्मक आहे.
- यासंबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल.
- त्यावर चर्चा करून जे प्रश्न तातडीने मार्गी लावता येतील, ते लावले जातील.
- इतर प्रश्नांसाठी संबंधित यंत्रणा आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.’