मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे देशाचे अर्थचक्रचं बदललं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे कुटुंब उद्धवस्त झाले, देशाच्या कानाकोपऱ्या राहणाऱ्या काही मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. तसंचं या कोरोनामुळे राजकीय पक्षांनासुद्धा फटका बसताना दिसत आहे. भाजपा आणि काँग्रेसला मिळणाऱ्या देण्यांमध्ये ४५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे समोर आले आहे. आकडेवारीनुसार २०२०-२१ मध्ये काँग्रेस पक्षाला अधिक फटका बसला असून ७४.५ कोटी रुपये मिळाले आहेत तर भाजपाला २०२०-२१ मध्ये मिळालेल्या रकमेत मागील वर्षाच्या तुलनेत ३९ टक्क्यांनी घट झाली आहे.
निवडणूक आयोगाला दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२०-२१ मध्ये भाजपाला मिळालेल्या रकमेत मागील वर्षाच्या तुलनेत ३९ टक्क्यांनी घट झाली आहे. त्या काळात पक्षाला ४७७.५४ कोटी रुपये मिळाले. तर २०१९-२० मध्ये हा आकडा ७८५ कोटी रुपये आणि २०१८-१९ मध्ये ७४२ कोटी रुपये होता.
२०२०-२१ मध्ये काँग्रेसला ७४.५ कोटी रुपये मिळाले. २०१९-२० मध्ये मिळालेल्या १३९ कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम ४५ टक्क्यांनी कमी झाली आहे. २०१८-१९ मध्ये काँग्रेसला १४६ कोटी रुपये मिळाले. २०२०-२१ मधील देणग्या कमी होण्याचे काराण कोरोना आणि बाजारावरील आर्थिक परिणाम असू शकते.
काँग्रेसकडे निधीची कमतरता आहे. याला सामोरे जाण्यासाठी पक्षानेही डाव्यांचे केरळ मॉडेल स्वीकारण्याची तयारी केली आहे. या मॉडेल अंतर्गत, डावे घरोघरी प्रचार करतात, ज्या अंतर्गत घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणावर निधी उभारला जातो. सोबतच देणगीदारांना त्याबदल्यात स्लिपही दिली जाते.