मुक्तपीठ टीम
जळगावात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत एमओ-एमबीबीएस या पदावर ४५ जागा, एमपीडब्ल्यू -महिला या पदावर ४५ जागा, स्टाफ नर्स महिला या पदावर ४१ जागा, स्टाफ नर्स पुरुष या पदावर ०४ जागा अशा एकूण १३५ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण जळगाव आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- पद क्र.१- एमबीबीएस
- पद क्र.२- १) विज्ञान क्षेत्रात १२वी उत्तीर्ण २) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
- पद क्र.३- जीएनएम/ बीएससी नर्सिंग
- पद क्र.४- जीएनएम/ बीएससी नर्सिंग असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार तर,राखीव प्रवर्गाकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग नवीन बिल्डींग, जिल्हा परिषद, जळगाव
अधिक माहितीसाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइट http://zpjalgaon.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.