मुक्तपीठ टीम
शिवसेनेने दोन उमेदवार दिल्यामुळे अपक्ष लढणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उमेदवारीबाबत गंभीर आरोप केला. दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
…मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल!!
- ‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं-खोटं करण्याचं संभाजीराजेंचं आव्हान उद्धव ठाकरे यांनी स्वीकारावं.
- मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल.
- तसंच महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायचा नैतिक अधिकारही नाही, एखादं तथाकथित सेक्युलर नाव शोधा.
युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल?
- राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला.
- शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचं छ. संभाजीराजे सांगताहेत.
- शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल?
- संभाजीराजेही खोटं बोलताहेत?
- त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं?