Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवडकरांच्या जलआक्रोशाची देवेंद्र फडणवीसांनी दखल घ्यावी – अजित गव्हाणे

पाच वर्षांतील भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे शहरात पाणीटंचाई

May 26, 2022
in घडलं-बिघडलं
0
Ajit gavhane And devendra Fadnavis

मुक्तपीठ टीम

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्याा पवना धरणात पाणीसाठा असतानाही गेल्या तीन वर्षांपासून भाजप सत्ताधार्यांमच्या निष्क्रीय आणि भ्रष्ट कारभारामुळे पिंपरी-चिंचवडकरांवर पाण्यासाठी आक्रोश करण्याची वेळ आली आहे. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलन करणार्यार देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमधील पाणीटंचाईची जबाबदारी स्विकारून शहरवासियांची माफी मागावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्षाने औरंगाबाद येथे काढलेल्या जलआक्रोश मोर्चावर राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांनी जोरदार टीका केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाने औरंगाबाद येथे केलेले आंदोलन हे हास्यास्पद ठरले आहे. ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे त्यातील अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही अशीच स्थिती आहे. आमची महापालिकेत सत्ता असताना शहरात कधीही पाणीटंचाई निर्माण झाली नाही. योग्य नियोजन आणि चांगल्या पाणीपुरवठ्यासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता.
परंतू महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर अवघ्या दीडच वर्षांत शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले. पवना धरण भरलेले असतानाही केवळ निविदा काढणे, भ्रष्टाचार करणे, त्यातून स्वत:ची घरे भरणे यामध्ये गुंतलेल्या भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याचा अक्षरश: तीन तेरा वाजविले. नियोजनाच्या अभावामुळे एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे शहरातील जनतेवर जलआक्रोश करण्याची वेळ आली. शेकडो कोटींच्या निविदा काढल्यानंतरही भाजपाला शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करता आलेला नाही. हे अपयश भाजपच्या नेत्यांचे नव्हे काय? असाही प्रश्न गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे.

२४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी शहरवासियांना दिले होते. मात्र ते सत्ताकाळात दिवसातून एकवेळा देखील पाणी देऊ शकले नाहीत. खोटी आश्वासने देणे, भूलथापा मारणे आणि त्यातून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपनेत्यांचा धंदा असून जनता येत्या महापालिका निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.

फडणवीसांनी दखल घ्यावी

पिंपरी-चिंचवडकरांना सध्या जो जलआक्रोश करावा लागत आहे त्याची फडणवीस यांनी दखल घ्यावी. तसेच पिंपरी-चिंचवडकरांना खोटे आश्वासन दिल्याबद्दल जाहीर माफी मागावी. तसेच आपल्या सत्ताकाळात ज्या पदाधिकार्यांजनी भ्रष्टाचार, लाचखोरी, खंडणीखोरी केली त्याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी. ज्या जनतेने अत्यंत विश्वासाने सत्ता तुम्हाला दिली होती त्याचा हिशोब जनतेला देण्याची वेळ आलेली असल्याने नाहक इतर ठिकाणी राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलने करण्याऐवजी ज्या जनतेचा तुमच्या पदाधिकार्यां नी विश्वासघात केला त्याचे उत्तर अगोदर पिंपरी-चिंचवडकरांना द्यावे, असे आवाहनही गव्हाणे यांनी केले आहे. पवना जलवाहिनीचे राजकारण पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादीकडून पवना जलवाहिनीचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र भारतीय जनता पक्षाने याबाबत वेगळी भूमिका घेत या प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे शहरवासियांना आज पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका भाजपाने घेण्याचे पाप भाजपने केले आहे. तर भामा आसखेडची पाणीयोजना पुण्यासाठी सुरू झाली. मात्र पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या सत्ताधाऱ्यांना ही योजना सुरू करण्यात अपयश आले आहे. भ्रष्टाचाराच्या गर्तेत बुडालेल्या भाजपनेत्यांनी निविदा प्रक्रियेत केलेल्या अनागोंदीमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडल्यामुळे शहरवासियांवर पाण्याचे दुर्भिक्ष ओढावल्याचा आरोपही गव्हाणे यांनी केला आहे.


Tags: Ajit Gavhanedevendra fadnavispimpri chinchwadअजित गव्हाणेदेवेंद्र फडणवीसपिंपरी चिंचवड
Previous Post

वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दंड वसुलीच्या तक्रारींची गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली दखल

Next Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियासह २ बँकांचे खासगीकरण होणार!

Next Post
Central Bank Of India and Indian Overseas Bank

सेंट्रल बँक ऑफ इंडियासह २ बँकांचे खासगीकरण होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!