मुक्तपीठ टीम
हिंदुत्ववादाची नव्यानं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गाजावाजा झालेला अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. भाजपाचे उत्तरप्रदेशातील दबंग नेते खासदार बृजभूषण शरण यांनी राज ठाकरेंच्या अयोध्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. उत्तर भारतीयांची माफी मागावी, तोपर्यंत त्यांना उत्तरप्रदेशात पाय ठेवू देणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात मनसेला उघडपणे हिंदुत्वावर साथ देणाऱ्या भाजपाने स्वत:च्याच खासदाराच्या दंबगगिरीविरोधात मौन बाळगले. त्यामुळे अखेर राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्याचे जाहीर केले आहे.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
मिशन अयोध्येनं झाली असती प्रतिमानिर्मिती
- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे मनसेसाठी वातावरणनिर्मितीची चांगली संधी होती.
- भाजपालाही मनसेशी युती करण्यासाठी त्या वातावरणाचा फायदा झाला असता.
- राज ठाकरेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वारसा पुढे नेत आहे, असा संदेशही या दौऱ्यातून देता आला असता.
- त्यामुळेच शिवसेनेही आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा जाहीर केला होता.
बृजभूषण शरण सिंह यांची राज ठाकरेंविरोधात दबंगगिरी!
- भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह हल्लाबोल करत आहेत.
- ते म्हणाले की, राज ठाकरेंनी अयोध्येत येण्याआधी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी.
- आता त्यांना अयोध्येची आठवण येऊ लागली आहे.
- तसेच, योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट नाकारावी. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना भेट देऊ नये, असा सल्लाही सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.
- त्यांनी सातत्यानं राज ठाकरेंचा अतिशय वाईट शब्दात उल्लेख केला.
- साध्वींनी समजवल्यानंतरही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही.
उत्तर भारतीयों को अपमानित करने वाले राज ठाकरे को अयोध्या की सीमा में घुसने नहीं दूंगा
अयोध्या आने से पहले सभी उत्तर भारतीयों से हाथ जोड़कर माफ़ी मांगे राज ठाकरे#MNS #RajThackeray #Ayodhya @ANI @ANINewsUP— BrijBhushan Sharan Singh MP (@sharan_mp) May 5, 2022
कोण आहेत बृजभूषण सरण?
- बृजभूषण सिंह हे कैसरगंजचे भाजपचे खासदार आहे.
- बृजभूषण सरण सिंह हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत.
- यूपी निवडणुकीदरम्यान त्यांनी हिजाब वादावर मोठे वक्तव्य केले होते.
- ते म्हणाले की, हिजाब ही तालिबानची विचारधारा आहे.
- ही दहशतवाद्यांची विचारसरणी आहे.
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर भाष्य करताना ते म्हणाले होते की, आज मुस्लिमांकडे ५७ देश आहेत आणि हिंदूंचा एकही देश नाही.
- गांधीजींनी ते होऊ दिले नाही.
- देशाच्या शूर सुपुत्रांची नावे इतिहासाच्या पानातून गायब झाली.