Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: टीव्ही 9 मराठी X झी २४ तास अटीतटीची स्पर्धा! दोघांच्या मार्केट शेअरमध्ये एकाच टक्क्याचा फरक!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
TV Rating

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

मराठी न्यूज चॅनल्समधील स्पर्धा १९ व्या आठवड्यातही टीव्ही 9 मराठी आणि झी २४ तास या दोन चॅनलमध्येच दिसते आहे. गेले काही आठवडे टीव्ही 9मराठीचा मार्केट शेअर काहीसा कमी होत असला तरी आजही ते चॅनल क्रमांक एकचं आपलं स्थान टिकवून आहे. न्यूज चॅनल्सचं रेटिंग सुरु झाल्यापासून सतत १४ आठवडे टीव्ही 9 मराठीच पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. पण गेले काही आठवडे काहीसा घटणारा झी २४ तासचा मार्केट शेअर या आठवड्यात पुन्हा ०.७ने वाढला आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील चॅनल्समधील अंतर त्यामुळे २.३ वरून अवघ्या एकवर आलं आहे. एबीपी माझाचीही काहीसी प्रगती आहे. तर न्यूज १८ लोकमत अद्यापही पाचव्या क्रमांकावर पण प्रगतीपथावर आहे. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावरील साम आणि सहाव्या क्रमांकावरील लोकशाहीची या आठवड्यातही घसरणच आहे.

टीव्ही रेटिंगमधील महत्वाचे पॉईंट्स…

  • हा या वर्षातील रेटिंगचा १८ वा आठवडा आहे.
  • पण न्यूज चॅनलचे स्थगित असलेले रेटिंग सुरु झाल्यानंतरचा हा १४वा आठवडा आहे.
  • या आठवड्यातही चॅनल्सच्या मार्केट शेअरमधील स्थानांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.
  • मराठीतील सहा चॅनल्सच्या रेटिंगमध्ये टीव्ही 9 मराठीच पहिल्या स्थानी आहे. पण .६चा फरक आला आहे.
  • झी २४ तास हे चॅनल या आठवड्यात ०.७ने पुढे गेलं आहे.
  • एबीपी माझा ०.२ ने पुढे गेले आहे.
  • साम या आठवड्यातही .२ने मागे गेले आहे.
  • न्यूज 18 लोकमत याही आठवड्यातही .२ ने वाढले आहे.
  • लोकशाही सहाव्या क्रमांकावर असून या आठवड्यातही .२ने मागे गेले आहे.

कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

  • मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २७.७ % मार्केट शेअरसह टीव्ही9 मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ आहे. त्यांच्यात ०.६ ची घट आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावर २६.७% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे. गेल्या गुरुवारपेक्षा त्यांच्यात ०.७ ची वाढ आहे.
  • एबीपी माझा १९.२ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्यांच्यात ०.२ची वाढ आहे.
  • साम टीव्हीने .२ची घट झाली असून ११.८% मार्केट शेअरसह चौथ्या क्रमांकावर आहे.
  • पाचव्या क्रमांकावर ९.६ % मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. त्यांच्यात ०.२ची वाढ आहे.
  • सहाव्या क्रमांकावरील लोकशाही .२ ने मागे गेले असून त्यांचे ५.१ % मार्केट शेअर आहे.

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • या गुरुवारी वर्षातील १४ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग ११, १२, १३ आणि १४ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

Tulsidas Bhoite
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

गेल्या आठवड्यात कसं होतं मराठी न्यूज चॅनल्सचं रेटिंग…

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: कट्ट्याचा माझाला किंचित फायदा, मात्र, बुस्टर नाही! माझा, लोकमत सोडून इतर चौघांना वाट्यात काहीसा घाटा!

 

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता.
नक्की पाहा:


Tags: Marathi News Channelsmuktpeethtulsidas bhoiteTV RatingTV9 MarathiZee 24 Taasझी २४ तासटीव्ही ९ मराठीटीव्ही रेटिंगतुळशीदास भोईटेमराठी न्यूज चॅनल्समुक्तपीठ
Previous Post

मिरा-भाईंदरच्या पाणी पुरवठ्याबाबत आठवड्यात आवश्यक उपाययोजना कराव्यात – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Next Post

पेट्रोल-डिझेलचे भाव भडकते…तरीही इंडियन ऑइलचा निव्वळ नफा का घटला?

Next Post
Indian Oil

पेट्रोल-डिझेलचे भाव भडकते...तरीही इंडियन ऑइलचा निव्वळ नफा का घटला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!