Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिरा-भाईंदरच्या पाणी पुरवठ्याबाबत आठवड्यात आवश्यक उपाययोजना कराव्यात – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

May 19, 2022
in सरकारी बातम्या
0
मा.मंत्री जयंत पाटील यांची मीरा भाईंदर पाणी बाबत बैठक 2

मुक्तपीठ टीम

मिरा भाईंदर महानगरपालिकेतील भागांना पाणी पुरवठा करण्यासाठी आठ दिवसांच्या आत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिली.            

मिरा भाईंदर महानगरपालिकेस मुंबई महापालिकेकडून दररोज १.५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी केली आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस आमदार गीता जैन, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, सचिव विलास राजपूत, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले आदी उपस्थित होते.            

मिरा भाईंदर महानगरपालिकेला पाणी देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. दहिसर चेक नाका ते म्हाडा संकुलपर्यंत जलवाहिनीचे काम मिरा भाईंदर महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका आणि मुंबई महापालिकेच्या वाहिनीची आंतरजोडणी पूर्ण झाली आहे. मात्र अद्यापही पाणीपुरवठा सुरू झाला नाही, असे आमदार गीता जैन यांनी सांगितले.            

यावर सदरच्या जलवाहिनीची तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही तांत्रिक कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी काही कालावधी लागेल, असे बैठकीत सांगण्यात आले.            

यावर पाणी देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तांत्रिक बाबी तपासून त्यावर योग्य कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी दिल्या.            

यावेळी मुंबई महापालिका उपायुक्त बी. एम. राठोड, जल अभियंता संजय आयते आदी उपस्थित होते. 

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना            

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिल्या.            

घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सारंगपूरी, खैरे, साठगांव, शिलोत्तर, शिवनेरी, धसई येथील डावातीर कालवा प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली.            

भातसा धरणाच्या पाणी वापराचे फेर जलनियोजन करून या कालव्यांसाठी आवश्यक पाण्याची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहापूर तालुक्यातील मुंमरी प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना ठाणे जिल्हाधिकारी यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.            

जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, सचिव प्रकल्प समन्वय विलास राजपूत व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Tags: jayant patilmira bhayanderMira Bhayander Municipal Corporationजंयत पाटीलमिरा-भाईंदरमुंबई महापालिका
Previous Post

“उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा”

Next Post

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: टीव्ही 9 मराठी X झी २४ तास अटीतटीची स्पर्धा! दोघांच्या मार्केट शेअरमध्ये एकाच टक्क्याचा फरक!!

Next Post
TV Rating

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: टीव्ही 9 मराठी X झी २४ तास अटीतटीची स्पर्धा! दोघांच्या मार्केट शेअरमध्ये एकाच टक्क्याचा फरक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!