मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलाने आपली ताकद आणखी वाढवली आहे. नौदलाने पहिल्या स्वदेशी जहाजाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. डीआरडीओच्या सहकार्याने, ही चाचणी बालासोर, ओडिशा येथील एकात्मिक चाचणी श्रेणी येथे पूर्ण करण्यात आली. सीकिंग ४२बी हेलिकॉप्टरमधून स्वदेशी बनावटीच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वीपणे करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी बोलताना एका वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याने सांगितले, “विशिष्ट क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दिशेने हे फायरिंग एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरणाला दुजोरा देते.”
क्षेपणास्त्र चाचणीचे व्हिडिओ नौदलाने शेअर केले
- नौदलाने या क्षेपणास्त्र चाचणीचे दोन व्हिडिओही शेअर केले आहेत.
- दोन्ही व्हिडिओंमध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपण दाखवण्यात आले आहे.
- यात सीकिंग ४२बी हेलिकॉप्टर क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली जातात आणि क्षेपणास्त्र आपले लक्ष्य गाठण्यात यशस्वी होतात.
काही महिन्यांनंतर ब्रह्मोसची चाचणी होणार
- अवघ्या महिन्याभरापूर्वी, भारतीय नौदल आणि अंदमान निकोबार कमांडने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या जहाजविरोधी व्हर्जनची यशस्वी चाचणी घेतली.
- अवघ्या एक महिन्यानंतर, नौदलाने स्वदेशी विकसित केलेल्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राचे पहिले फायरिंग यशस्वीपणे केले.